सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या  ''त्या'' जाहिरातीवर बंदी

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 13 October 2020

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी या जाहिरातीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. कुणाला हिंदू आणि मुस्लिम यांच्यात असणा-या एकतेविषयी अडचण असल्यास त्यांनी आता भारतावरच बहिष्कार घालावा.भारतातील विविधेतील एकता जपण्याचे काम य़ा जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे.

मुंबई-आंतरधार्मिक विवाह झाल्यानंतर मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची जाहिरात आता भलतीच चर्चेत आली आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे त्या जाहिरातीला प्राप्त झालेला लव जिहादचा रंग हे होय.  ही जाहिरात तयार करणा-या टाटा कंपनीला ती जाहिरात अखेर मागे घ्यावी लागली आहे. तनिष्क या ब्रँडच्या या जाहिरातीवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी या जाहिरातीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. कुणाला हिंदू आणि मुस्लिम यांच्यात असणा-या एकतेविषयी अडचण असलेल्यांनी आता भारतावरच बहिष्कार घालावा.भारतातील विविधेतील एकता जपण्याचे काम य़ा जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे. मात्र काहींना त्य़ात देण्यात आलेला संदेश हा चुकीचा वाटत आहे. सोशल मीडियातून या जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी करणा-यांची संख्या वाढत आहे. सतत होणा-या टीकेमुळे अखेर ही जाहिरात कंपनीच्यावतीने मागे घेण्यात आली आहे. एक आंतरधार्मिक विवाह दाखवून त्यात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम या जाहिरातात दाखविण्यात आल्याने त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी याप्रकारची जाहिरात ही लव जिहादचा पुरस्कार करत असल्याची टीका केली आहे.

सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 

एक महिला आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन जात असून तिला तिची सासू सगळ्यांसमोर घेऊन येते. तिच्य़ा सासूने सलवार परिधान केला आहे. अशावेळी तिची सून तिला तुमच्या घरात अशाप्रकारचा कार्यक्रम करण्याची रील नसेल हे सांगते. त्यावेळी तिची सासू तिला असे जरी नसले तरी मुलीला आनंदी ठेवण्याची रीत तर प्रत्येक घरातच असते. असे सांगते. हे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे. मात्र ही जाहिरात लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq चा इशारा दिल्याने  आता ही जाहिरात युट्युबवरुन काढून टाकण्यात आली आहे.

 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanishq removes its ad after boycott trends and trolling