
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळण्यापूर्वी आपल्याला बराचकाळ संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तारक मेहताच्या मालिकेतील एक महत्वाचे नाव म्हणून जेठालाल यांचे नाव घ्यावे लागते.
मुंबई - टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय असणा-या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. अशा या मालिकेतील वेगवेगळी पात्रं कायम प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतात. त्यापैकी महत्वाची एक बातमी गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाली आहे. जेठालाल हे या मालिकेतील एक महत्वाची व्यक्ती असून ती भूमिका साकारणा-या दिलीप जोशी यांनी आपल्या संघर्षमय आठवणींना उजाळा दिला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळण्यापूर्वी आपल्याला बराचकाळ संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तारक मेहताच्या मालिकेतील एक महत्वाचे नाव म्हणून जेठालाल यांचे नाव घ्यावे लागते. मागील 12 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तारक मेहता’च्या लोकप्रियतेमागे अभिनेता दिलीप जोशी उर्फ ‘जेठालाल चंपकलाल गडा’ यांचे योगदान महत्वाचे आहे. या व्यक्तिरेखेभोवती ही मालिका पुढे सरकत असल्याचे दिसून येते. आज ज्या यशाच्या शिखरावर जोशी आहेत यापूर्वी त्यांना ५० रुपयांसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्टँडअप कॉमेडियन सौरभ पंतला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी आपल्या करिअरमधील काही थक्क करणारे अनुभव सांगितले. जोशी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरुन केली होती. ते एक बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायचे. ज्या दिवशी नाटक असेल त्यावशी स्टेजवरील साहित्य व्यवस्थित ठेवणे, कलाकारांच्या चहा-पाण्याची व्यवस्था करणे अशी काही काम ते करायचे. बॅकस्टेज काम करता करता त्यांना नाटकात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नाटकाच्या एका भागासाठी त्यांना केवळ ५० रुपये मिळायचे.
आपल्या चाहत्यांना कधीही हार मानू नका अन् संधीचं सोनं करण्यासाठी तयार राहा असा सल्ला देणा-या जोशी यांच्या सुरुवातीचा काळ खडतर होता. अभिनयाची आवड आणि प्रचंड महत्वाकांक्षा यांच्या जोरावर त्यांनी नाटक, मालिका आणि पुढे चित्रपट असा प्रवास केला आहे.