TMKUC:मला असित मोदींनी असभ्य भाषेत... तारक मेहता सोडल्यानंतर शैलेश लोढाने सांगितलं खरं कारण

'लल्लनटॉप'ने घेतलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा यांनी शो सोडण्यामागचं कारण जाहीर केलंय.
Shailesh Lodha
Shailesh LodhaEsakal
Updated on

Tarak Mehta ka Ulta Chashma:'तारक मेहता का उलटा चष्मा'हा कार्यक्रम मागच्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. त्यातील एक पात्र म्हणजे 'तारक मेहता'. शैलेश लोढा यांनी हे पात्र साकारले होते. मात्र, त्यांनी अचानक या कार्यक्रमातून एक्झिट घेतली.

त्यांनी अचानक कार्यक्रम सोडल्याने सर्व चाहत्यांना धक्का बसला. त्यांनी हा कार्यक्रम का सोडला ? याचं कारण कोणालाही माहिती नव्हतं, एव्हाना त्यामागचं कारण शैलेश लोढा यांनी कधीही जाहीर केलं नाही. मात्र, 'लल्लनटॉप'ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी शो सोडण्यामागचं कारण जाहीर केलंय.

शैलेश लोढा यांना मुलाखतीत 'तारक मेहता का उल्टा चष्मा'हा कार्यक्रम का सोडला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर या गोष्टीचा उलगडा केला. ते म्हणाले की 'मला 'गुड नाईट'या सब टीव्ही चॅनलवरील स्टँड कॉमेडी शोमध्ये मला गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होत. त्या कार्यक्रमात मला माझी एक कविता सादर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाचे निर्मात्यांशी माझी जुनी ओळख होती, तर त्यामुळे मला त्या ठिकाणी जावं लागंल.'(Latest Marathi News)

यापुढे शैलेश लोढा म्हणाले की,"मात्र. मी त्या कार्यक्रमात जाऊन कविता सादर करणं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांना आवडलं नाही. त्यावेळी त्यांनी मला असभ्य भाषेत सुनावलं. ते सिरिअलमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचं नोकर समजतात. या गोष्टीमुळे माझा आत्मसन्मान दुखावला गेला. म्हणून मी शो सोडला"

शैलेश लोढा यांनी कार्यक्रम सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रमाला रामराम ठोकला. (Latest Marathi News)

Shailesh Lodha
Rain Update: पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; घाटांतील प्रवाशांना 'सतर्क'तेचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.