'जेठालालला' चक्क स्पॅनिश पत्रकाराची कॉमेंट; म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Joshi
'जेठालालला' चक्क स्पॅनिश पत्रकाराची कॉमेंट; म्हणाला...

'जेठालालला' चक्क स्पॅनिश पत्रकाराची कॉमेंट; म्हणाला...

सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. त्यात जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यांची ख्याती भारताबरोबरच परदेशातही पसरली आहे.

जेठलालची भूमिका साकरणारे दिलीप जोशीची लोकप्रियता एवढी आहे की एका स्पॅनिश पत्रकाराने त्याच कौतुक केलं आहे. एका स्पॅनिश पत्रकाराने जेठालालचा एक फोटो पोस्ट केल्यानंतर त्याचे चक्क २०० फॉलोवर्स वाढले आहेत. याची माहिती स्वत: पत्रकार डेव्हिड लाडाने ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. स्पॅनिश पत्रकार डेव्हिड लाडाने ट्विट करत लिहिलं, 'जेठालालचा उल्लेख करण्यास उशीर झाला. क्षणार्धात माझे २०० फॉलोअर्स वाढले आहेत.' यावरून विचार करा की जेठालालची लोकप्रियता किती आहे. या पत्रकाराने आपल्या अकाऊंटवरून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा मुख्य अभिनेता दिलीप जोशी यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं 'जेठालाल चांगला दिसतो.'

टीआरपीमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अनुपमा आणि इमली सारख्या मालिकांनंतरही ही मालिका टॉप ५ मध्ये आहे.

loading image
go to top