तारक मेहता..' मधील 'हा' कलाकार दुसऱ्यांदा बोहल्यावर| Priya Ahuja | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Ahuja
तारक मेहता..' मधील 'हा' कलाकार दुसऱ्यांदा बोहल्यावर

तारक मेहता..' मधील 'हा' कलाकार दुसऱ्यांदा बोहल्यावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सब टी.व्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मध्ये भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे पंसतीचे आहेत. याच मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने पुन्हा एकदा लग्न केलं आहे. तिच्या लग्नात तारक मेहताची संपूर्ण टीम आली होती.

प्रियाने दिग्दर्शक पती मालवा राजदा यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्न केलं आहे. १९ नोव्हेंबर रोजी प्रिया आणि मालव राजदा यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये प्रियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो पोस्ट करत ‘परिंची कहाणी खरी झाली’, असं कॅप्शन प्रियाने दिलं आहे.प्रिया आणि मालवाला २ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, लग्नाच्या ८ वर्षांनंतर म्हणजेच २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रियाने तिच्या मुलाला जन्म दिला.

हेही वाचा: लग्न मैत्रिणीचं, चर्चा मात्र आलियाची!

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील रिटा रिपोर्टर आणि टप्पू सेना यांचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे तिच्या लग्नात संपूर्ण टप्पू सेनाने हजेरी लावली होती. तसेच तिच्या लग्नात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील कलाकार जसं की अंबिका रंजनकर (कोमल), सुनयना फोजदार (अंजली), कुश शाह (गोली), पलक सिंधवानी (सोनू) यांनी लग्नात आले होते.

loading image
go to top