कोणं म्हणतं ‘लक्ष्मी’ प्रसन्न होत नाही,जेव्हा होते तेव्हा...  

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 13 November 2020

लक्ष्मी चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे.लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्याच अडकला होता. करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता.  
 

मुंबई - बहुचर्चित 'लक्ष्मी'  या अक्षय कुमारच्या चित्रपटांवर सुरुवातीपासूनच अनेकांनी टीकेचा सूर लावला. रसिकांच्या पसंतीस न उतरलेला सिनेमा म्हणून त्याच्याविषयी लिहिले गेले. सोशल मीडियातूनही त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहून नाकं मुरडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. असे असतानाही या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर केलेली कमाई थक्क करणारी आहे.

मागील आठवड्यात ‘लक्ष्मी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढील एक दोन दिवसांतच त्याच्यावर प्रेक्षकांकडून टीका करण्यात आली. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर  परदेशातील काही चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शत करण्यात आला होता. डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्मी’ ने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटवरुन  ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या  कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत अक्षय कुमारचा लक्ष्मी हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे जो वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला आहे.

 हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे.लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्याच अडकला होता. करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता.  
 
 

#Laxmii – #Australia…
Mon A$ 28,498
Tue A$ 22,128
Wed A$ 13,572
Thu A$ 11,958
Total: A$ 76,156 [₹ 41.09 lakhs] / 51 locations@comScore

— taran adarsh (@taran_adarsh) November 13, 2020

न्यूझीलंडमध्ये ‘लक्ष्मी’ चित्रपटाने २८.३८ लाख रुपये कमाई केली.

#Laxmii – #NewZealand…
Mon NZ$ 22,486
Tue NZ$ 16,792
Wed NZ$ 9,878
Thu NZ$ 6,554
Total: NZ$ 55,710 [₹ 28.38 lakhs] / 19 locations@comScore

— taran adarsh (@taran_adarsh) November 13, 2020

फिजीमध्ये १०.३४ लाख रुपये कमाई केली आहे.

#Laxmii – #Fiji…
Mon FJ$ 12,171
Tue FJ$ 7,590
Wed FJ$ 6,752
Thu FJ$ 2,620
Total: FJ$ 29,133 [₹ 10.34 lakhs] / 6 locations@comScore

— taran adarsh (@taran_adarsh) November 13, 2020

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taran adarash revile box office collection of laxmi