Bhaurao Karhade: ख्वाडा फेम दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे लवकरच अडकणार लग्नबंधनात? फोटो व्हायरल

Bhaurao Karhade Engagement News:
Bhaurao Karhade Engagement News: Esakal

Bhaurao Karhade Engagement News: मराठमोळे आणि लोकप्रिय दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना 'ख्वाडा'आणि 'बबन' आणि आता टीडीएम सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील खुप प्रसिद्ध चेहरा आहे.

काही दिवसांपुर्वी त्यांचा टीडीएम हा वेगळ्या थाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता भाऊराव यांनी चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Bhaurao Karhade Engagement News:
"मला Don 3 मध्ये काम हवंय" म्हणत पठ्याचा थेट दीपिकाला मॅसेज! तिनेही रिप्लाय देत सांगितलं...

सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेयर करत त्यांनी ही बातमी दिली. जोडीदारासोबत फोटो शेयर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलयं , "आता लवकरच खरा सिनेमा सुरू.... तुम्ही सगळ्यांनी आशिर्वाद द्यायला नक्की यायचंय..."

Bhaurao Karhade Engagement News:
Prajakta Mali: "प्रेमात पडले आणि कळलंच नाही"; असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

भाऊ कऱ्हाडे यांनी ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी भाऊ आणि त्यांचा टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आला होता.

Bhaurao Karhade Engagement News:
Vivek Agnihotri On Bollywood : "बॉलिवूड मुर्ख कलाकारांनी भरलंय..." म्हणत विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूडला ठोकला रामराम

या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला थिएटमध्ये स्क्रिन्सच न मिळाल्यानं कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोळ्यात पाणी होते. त्यानंतर अनेक राजकिय नेते आणि कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात ते करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com