
Tejashwi Prakash: बिग बॉसच्या गेल्या पर्वात विजयी झालेल्या तेजस्वी प्रकाशनं सोशल मीडियावर आपला खास चाहतावर्ग तयार केला आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतात. काही (Karan Kundra) दिवसांपूर्वी त्यांचे गोव्याच्या पार्कमधील काही फोटो व्हायरल झाले होते. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करतानाचा तो व्हिडिओ (Bigg Boss News) नेटकऱ्यांना आवडला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या कपल्सला ट्रोल केले होते. आता तेजस्वी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.
तेजस्वी आणि करण लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तेजस्वीनं गोव्यामध्ये करणसाठी एक नवीन घर खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. त्यावर करणनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. करणनं सर्वात पहिल्यांदा तेजस्वीचं मनापासून कौतूक केलं आहे. त्यानं तेजस्वीला धन्यवाद दिले आहे. बिग बॉसच्या पंधराव्या सीझनमध्ये विजयी झालेल्या तेजस्वीनं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यापासून तिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. ती नेहमीच बातम्यांमध्ये राहिली आहे. बिग बॉसशिवाय ती नागिन नावाच्या मालिकेतही प्रमुख भूमिकेमध्ये दिसली आहे. त्याच मालिकेमुळे तिला बिग बॉसचं विजेतेपद मिळालं अशी टीका तिच्यावर झाली होती. नागिनच्या सहाव्या सीझनमध्ये तेजस्वीनं केलेलं काम चाहत्यांना आवडलं. त्यामुळे ती आणखी प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
आता तेजस्वीनं गोव्यात घर खरेदी करुन चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. घराचे फोटो पाहताच चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्वीनं ऑडी ही अलिशान कार खरेदी केली होती. गोव्यात बॉयफ्रेंड करणसोबत ती गेली होती. त्यावेळी तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. गोव्यात एक नवीन घर घेऊन तेजस्वीनं लग्नाचे संकेत दिले आहे. अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.