
Tejaswini Pandit: 'घरभाडं द्यायला गेले, नगरसेवकानं मला…’ तेजस्विनीचा धक्कादायक खुलासा
Tejaswini Pandit Marathi Actress : मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या बोल्डनेसनं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या नावाचा समावेश करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून तिनं बोल्डनेसनं अनेकांना चक्रावून टाकले आहे. सध्या तिची एक पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे.
मराठी ओटीटी विश्वामध्ये तेजस्विनीच्या सीरिजनं खळबळ उडवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिची रानबाजार नावाची मालिका आली होती. त्यामध्ये तिनं दिलेला बोल्ड सीन हा चाहत्यांचा चर्चेचा विषय होता. आता तिची अथांग नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावरुन सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत नाही. त्यामध्ये तेजस्विनीनं शेयर केलेला तिचा एक अनुभव नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावर तिला मिळालेल्या कमेंट देखील भन्नाट आहे.
अथांगच्या निमित्तानं तेजस्विनीनं एका मुलाखतीमध्ये त्या प्रसंगाविषयी सांगितलं आहे. ज्यावेळी आपण आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी एका नगरसेवकानं आपल्याला ऑफर दिल्याचा धक्कादायक खुलासा तेजस्विनीनं केला आहे. तेजस्विनीनं सांगितलं की, तेव्हा मी पुण्यातील सिंहगड रस्त्याला राहत होते. घराचे भाडे देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या ऑफिसला गेले होते. तेव्हा मला कळलं की आपल्या क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन कसा असतो ते...आपल्यातीच काही लोकांनी या क्षेत्राविषयी गैरसमज तयार केले आहेत. असे तेजस्विनीनं म्हटले आहे.
मराठी मनोरंजन विश्वामध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली गेली आहे. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा आहे. तिचा बोल्डनेस हा नेटकऱ्यांचा आणि चाहत्यांच्या विशेष चर्चेचा विषय आहे.