तेजस्विनीने मांडली कष्टक-यांची वेदना

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

तेजस्विनीने शेअर केलेला फोटो सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करणाऱ्या व्यक्तींच्या मनाच्या अवस्थेला तिने या फोटोतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई- मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कोरोना योध्द्यांसाठी घेतलेला पुढाकार सर्वस्तरांतून कौतूकास्पद ठरत आहे. एका अनोख्या पध्दतीने तिने त्या योध्द्यांना मानवंदना दिली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या रुपात तेजस्विनी पंडितने नवीन फोटो शेअर केला आहे.

तिने नव्याने शेअर केलेला फोटो सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करणाऱ्या व्यक्तींच्या मनाच्या अवस्थेला तिने या फोटोतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो. अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो. संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो, मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ? पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत…”, असे तिने त्या फोटोबद्दत लिहिले आहे.

यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील सात वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. या प्रत्येक फोटोमधून तिने मुंबई पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती, रुग्णवाहिका चालक आणि सिमेवर लढणारे जवान यांचे आभार मानले आहेत.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini Pandit Navratri Special photo tribute to Corona warrior