Allu Ramesh Passed Away: अभिनेते अल्लू रमेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
Telugu Actor Allu Ramesh Dies Of Cardiac Arrest At 52
Telugu Actor Allu Ramesh Dies Of Cardiac Arrest At 52sakal
Updated on

Allu Ramesh Passed Away: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते अल्लू रमेश (Allu Ramesh) यांचे निधन झाले आहे.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अल्लू रमेश हे तेलगू सिने विश्वातील एक महत्वाचं नाव. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. यांच्या निधनाची वार्ता समजताच तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

(Telugu Actor Allu Ramesh Dies Of Cardiac Arrest At 52)

Telugu Actor Allu Ramesh Dies Of Cardiac Arrest At 52
Kiran Mane: पिच्चर तसा बरा हाय, पण.. नागराजच्या 'घर बंदूक..' विषयी किरण माने जरा स्पष्टच बोलले..

तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी यांनी अल्लू रमेश यांचे निधन झाल्याचे सोशल मीडियावर शेअर करत शोक व्यक्त केला आहे. आनंद रवी अल्लू रमेश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सोबत एक भावनिक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. 'तुम्ही माझा सर्वात मोठा आधार होता. रमेश गुरु, तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. अजूनही माझ्या हृदयात आणि मनात तुमचा आवाज ऐकू शकतो. मिस यू ..ओम शांती.' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अल्लू रमेश यांनी 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चिरुजल्लू' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी  'टोलू बोम्मलता', 'मथुरा वाइन', 'वेधी', 'ब्लेड' 'बाबजी आणि नेपोलियन' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  

'माँ विडकुलू' या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. अल्लू रमेश यांनी आपल्या दमदार अभिनयानं  आणि कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

'नेपोलियन' आणि 'थोलुबुम्मलता' यांसारख्या  चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. अल्लू रमेश यांनी  जवळपास 50 हून अधिक चित्रपट केले आहेत. 'अनएक्सपेक्टेड जर्नी'  हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com