Chaitanya Master: कर्जबाजारीपणाला कंटाळुन प्रसिद्ध कोरिओग्राफरची आत्महत्या! मृत्यूपूर्वी रेकॉर्ड..

Telugu Choreographer Chaitanya
Telugu Choreographer Chaitanya Esakal

तेलुगू इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेलुगू कोरिओग्राफर चैतन्यने रविवारी 30 एप्रिल रोजी आत्महत्या केली. चैतन्यावर कर्ज होते. ते कर्ज फेडू शकत नव्हता. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. दिवंगत कोरिओग्राफर चैतन्य लोकप्रिय तेलुगू डान्स शो धीमध्ये दिसला होता.

Telugu Choreographer Chaitanya
Maharashtra Din: गर्जा महाराष्ट्र माझा म्हणत कलाकारांनी जागवल्या महाराष्ट्र दिनाच्या खास आठवणी

चैतन्यला घेतलेले कर्ज फेडता आले नाही आणि त्यामुळे त्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे गळफास घेऊन जीवन संपवलं. केवळ कर्जाची परतफेड करण्यासाठी तो सक्षम नसल्याचं म्हणत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. चैतन्य लोकप्रिय तेलुगू डान्स शो 'धी'मध्ये दिसला होता.

Telugu Choreographer Chaitanya
Maharashtra Din: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फक्त एका 'च' वरुन आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाणांवर तुटून पडले होते..

चैतन्यने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने खुलासा केला आहे की तो कर्ज फेडू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर ओझे आहे.

व्हिडिओमध्ये चैतन्य म्हणाला, “माझी आई, वडील आणि बहिणीने माझी मनापासून खूप काळजी घेतली. मला कधीही कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची मनापासून माफी मागतो. मी अनेकांना नाराज केलं आहे आणि त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो. पैशाच्या बाबतीत मी माझा चांगुलपणा गमावला. केवळ कर्ज घेण्यास सक्षम नसून ते फेडण्याची क्षमताही असली पाहिजे. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. मी माझ्या कर्जाचा त्रास सहन करू शकत नाही."

Telugu Choreographer Chaitanya
Aryan Khan: "2 लाखांचं जॅकेट अन्...", आर्यनच्या लग्झरी ब्रँडच्या किंमती वरून भन्नाट मीम्स व्हायरल

चैतन्यच्या मृत्यूची बातमी कळताच, अनेक चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी कोरियोग्राफरला श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्विटर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com