Must Watched; नवीन काही सांगणा-या, कुतूहल शमविणा-या 10 डॉक्युमेंट्रीज

युगंधर ताजणे
Tuesday, 1 December 2020

असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते. ​

मुंबई - आपण जसं पाहतो तसा जगाचा कारभार असतो असे म्हणणा-यांना त्या नजरेआड काय काय चाललं आहे याची थोडीशीही माहिती नसते. असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते. जगातील सर्वोत्तम अशा 10 माहितीपटांची माहिती ज्यातून भवतालच्या परिस्थितीत काय चालले आहे याचे भान आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही.

 1. द ग्रेट हॅक - साधारण 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या या माहितीपटाला जगभरातून मोठया प्रमाणावर चाहत्यांकडून वाहवा मिळाली. त्याचा विषयही तितकाच रंजक होता. तो असा की, फेसबूक आणि क्रेंब्रिज अॅनालिटीका यांच्या घोटाळ्याचा हा विषय माहितीपटाच्या केंद्रस्थानी होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीत झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवण्याचे काम या माहितीपटाने केले होते.    

 2. टाय़गर किंग, मर्डर, महेम आणि मॅडनेस - तुम्हाला जर प्राण्यांविषयी आवड असेल तर हमखास पाहावी असा माहितीपट म्हणजे टायगर किंग, मर्डर, महेम आणि मॅडनेस. ही काही टिपिकल प्राणी प्रेमाविषयी माहिती देणारी चित्रमालिका नाही तर तो आहे जिवंत अनुभव. अमेरिकेतील एका झु पासून सुरु होणारं हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. नेटफ्लिक्सनं हा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर पहिल्या दहा दिवसांतच त्याला 34 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 

3. द हानी लँड - नितांतसुंदरतेचा अनुभव देणारा माहितीपट म्हणून द हानी लँडचा उल्लेख करावा लागेल. फिल्ममेकर्स तामारा कोटेत्सोवा आणि लुज्बो स्टेफेनोव्ह यांनी तीन वर्ष मेहनत घेऊन या माहितीपटाची निर्मिती केली आहे. त्याचे छायाचित्रण ही त्याची जमेची बाजू म्हणता येईल. जगभरातल्या अनेक मानांकित महोत्सवात या माहितीपटानं विविध पुरस्कार मिळवले आहेत. 

4. द केव्ह - रहस्य, थरार आणि भयानकता यांचा अनुभव घेण्यासाठी द केव्हच्या वाट्याला जावे अशी ही डॉक्युमेंटरी आहे. सिरीयामधला जीवघेणा प्रसंग त्यातील भयानता ही दिग्दर्शकानं मोठ्या परिणामकारकपणे पडद्यावर साकारण्यात आली आहे. जन्मानं सिरियन असलेल्या फेरस फय्याद यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं आहे. जबरदस्त पटकथा. प्रभावी छायांकन आणि दिग्दर्शन यामुळे हा माहितीपट आवर्जुन पाहावा अशा प्रकारातला आहे. 

5. अमेरिकन फॅक्टरी -  कामगारांच्या विरोधात जाणीवपूर्वक कारस्थानं करुन त्यांना संकटाच्या खाईत लोटू पाहणा-याची कथा सांगणारा माहितीपट म्हणून अमेरिकन इंचस्ट्रीचा उल्लेख करावा लागेल. जनरल मोटर्स मधील कामगारांना नोकरीवरुन कुठलीही कल्पना न देता कामावरुन कमी केले जाते. त्यावेळी काही चीनी कंपन्यांनी केलेली घुसखोरी त्याविरोधात कामगारांनी उभारलेला लढा याविरोधात अमेरिकन इंडस्ट्री भाष्य करते. 

6.  मिस अमेरिकाना - प्रसिध्द गायक टेलर स्विफ्ट हिच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा माहितीपट म्हणजे मिस अमेरिकाना. टेलरने कशाप्रकारे स्वतला सिध्द केले. त्या मार्गावरुन चालताना तिला कशाप्रकारे संकटांचा सामना करावा लागला हे या माहितीपटातून पाहता येते. 

7. नॉक डाऊन द हाऊस - राचेल लियर्स या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला हा माहितीपट अनेक अर्थानं वेगळा असा म्हणावा लागेल. नेट फ्लिक्सवर तो प्रदर्शित झाला होता. एका अनोख्या विषयाची मांडणी माहितीपटात करण्यात आली आहे. त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

8. फाईव्ह केम बॅक -   तीन भागाच्या एका सीरीजमध्ये फाईव्ह केम बॅक माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नॉन फिक्शन प्रकारातील हा माहितीपट आहे. दुस-या महायुध्दाचा काळ आणि त्यातील प्रसंग यावर मार्मिकपणे भाष्य त्यात करण्यात आले आहे. 

9. बियाँड द मॅट - कुस्ती पैलवानांची एक वेगळी कथा या माहितीपटातून मांडण्यात आली आहे. त्यात बॅरी बल्युस्टिनची कथा मांडण्यात आली आहे. यात आपल्याया WWE मधल्या एकापेक्षा एक सरस अशा पैलवानांची कथा  सांगण्यात आली आहे. त्यातून वेगळ्या विषयाला स्थान देण्यात आले आहे. 

10. अग्ली डेलिशियस - आपण जे खातो त्यातील शुध्द किती आणि सकस किती हा मोठा संशोधनाचा मुद्दा आहे. जे खातो ते अन्न कशाप्रकारे आपल्यापर्यत पोहचते याचा विचार आपण कधीही करत नाही. अशासगळ्या महत्वाच्या गोष्टीवर बारकाईने भाष्य करणारा माहितीपट म्हणून अग्ली डेलिशियसचा उल्लेख करावा लागेल. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten most watched documentaries ever build up knowledge and curiosity