Thalapathy Vijay: प्रदर्शनाच्या ३ दिवसांतच ‘वरिसु’चा जगभरात डंका; पार केला १०० कोटींचा आकडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thalapathy Vijay

Thalapathy Vijay: प्रदर्शनाच्या ३ दिवसांतच ‘वरिसु’चा जगभरात डंका; पार केला 100 कोटींचा आकडा

कोणतेही कुटुंब परिपूर्ण नसते, परंतु तरीही नातेसंबंध जपणे आवश्यक असतात कारण प्रियजन गमावून जग जिंकण्यात काहीच नसते. त्याच्या मागील चित्रपट बीस्टच्या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर, तमिळ सुपरस्टार थलपथी विजयच्या 'वारिसु' मध्ये अ‍ॅक्शन, इमोशन, कॉमेडी आणि रोमान्सचा एक परिपूर्ण कॉम्बो घेऊन परतला आहे. या चित्रपटात त्याने आपल्या चाहत्यांना एक परफेक्ट फॅमिली मॅन म्हणून प्रथम कुटुंबाचा संदेश दिला आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक मोठ्या चित्रपटांची टक्कर होताना दिसतेय. चित्रपटगृहात ‘वेड’ ‘कुत्ते’ आणि ‘वरिसु’ हे चित्रपट प्रेक्षकांना घेऊन येण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात थलपथी विजयच्या ‘वारीसू’ या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

अभिनेता थलपथी विजयचा चित्रपट ‘वरिसु’ हा ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या मनात गेली अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल मनात उत्सुकता होती. विजय इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या वारीसू या चित्रपटात पुन्हा एकदा पूर्वीच्या अंदाजात दिसून येणार आहे. वारीसू या या सिनेमाने जबरदस्त कामगिरी करून जगभरातून मोठाच गल्ला जमवला आहे.

हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

प्रेक्षकांकडून वारीसू या चित्रपटाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. वरिसु या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तसेच थलपथी विजयचा वारीसू या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसातच १०० कोटींचा आकडा पार केला आहे. वारीसू या चित्रपटाने जगभरातून १०३ कोटींची कमाई केली आहे. थालापती विजयचा ‘वरिसु’ १०० कोटींचा आकडा पार करणारा दहावा चित्रपट ठरला आहे.