Prajakta Mali: अयोध्या राम मंदिर सोहळ्यानिमित्त प्राजक्ता माळीने केलं हे आवाहन

प्राजक्ता माळीने राम मंदिर सोहळ्यानिमित्त खास पोस्ट लिहीली आहे
the appeal from actress Prajakta Mali on the occasion of Ayodhya Ram Temple inaguration
the appeal from actress Prajakta Mali on the occasion of Ayodhya Ram Temple inaguration SAKAL

Prajakta Mali on Ayodhya Ram Mandir Inaguration: आज अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे. देशभरातील भारतीय राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उत्सुक आहेत.

यानिमित्त आज पंतप्रधान मोदींसोबतच अनेक राजकीय नेते राम मंदिर सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. यातच काही बॉलिवूड मंडळीही अयोध्येला दाखल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास पोस्ट केलीय.

the appeal from actress Prajakta Mali on the occasion of Ayodhya Ram Temple inaguration
Kangana Ranaut In Ayodhya: कंगना अयोध्येला पोहचली, साफसफाईला लगेच सुरुवात केली!

प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर सुर्योदयाचा एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते,

"२२ जानेवारी २०२४. #सुवर्णदिन

शतकांच्या यज्ञातून उठली
एक केशरी ज्वाळा…
दहा दिशांच्या ह्रदयामधूनी
अरुणोदय झाला…

#जयश्रीराम #अयोध्या
सगळं सुंदर, मंगलमय, पावित्र्यपुर्ण असू दे; प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे. ही प्रत्येक “भारतीयाची” भावना असू दे. #भारत #प्रभू"

२२ जानेवारीला नो शूटींग

अशातच देशातील मनोरंजनाचे महत्वाचे केंद्र असलेल्या बॉलीवूडला आज सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे. आज अयोध्येत प्रभु श्रीराम यांच्या मंदिराचा भव्य उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने जानेवारीला बॉलीवूडमध्ये कोणत्याही प्रकारचे शुटींग होणार नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. जनसत्तानं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे.

रामलल्लाचे मनमोहक दर्शन

राम मंदिरात स्थापनेसाठी रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली होती. ही मूर्ती 51 इंच उंच आहे.

रामलल्लाच्या मूर्तीत त्यांचे बालस्वरूप सुंदर दिसतेय. या मूर्तीमध्ये ओम, गणेश, चक्र, शंख, गदा, स्वस्तिक यासह अनेक धार्मिक चिन्हे दिसतात. अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणात रामलल्लाची मूर्ती साकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com