The Entrepreneur: तुळजापूरात मराठीत शिकलेला प्रतिक लंडनमध्ये लोकांना नोकरीवर ठेवतोय...एका जिद्दीची कहाणी

'द आंत्रप्रेन्युअर' - प्रतिक शेलारच्या अविश्वसनीय धैर्याची कहाणी आता यूट्यूबवर आपण पाहू शकणार आहोत.
The Entrepreneur Documentary-Pratik Shelar
The Entrepreneur Documentary-Pratik Shelar Google

The Entrepreneur: अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार यांचे 'द आंत्रप्रेन्युअर' हे त्याचे एक उदाहरण.

तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक भारतीय उद्योजग. हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोप्पा नव्हता. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास आपल्याला 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटात पाहायला मिळणार आहे.

प्रतीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे. युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.

The Entrepreneur Documentary-Pratik Shelar
Aamir Khan Trolled: कार्तिक आर्यनसोबत लग्नात आमिरनं केली 'ही' हरकत..लोक म्हणू लागले,'आता हेच होतं बाकी..'

महाराष्ट्रातील तुळजापूर या पवित्र शहरात १९८८ साली जन्मलेल्या प्रतीक यांना लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती. त्यांची ही आवड एक उद्योजक म्हणून त्यांच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे त्यांच्या पालकांच्या ध्यानीमनीही नव्हते.

एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक यांचे वडील प्रवीण नानासाहेब शेलार जे तुळजापूर आणि उस्मानाबाद नगरपरिषदमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. प्रतीक यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयआयटी मधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर व्हावे.

परंतु, प्रतीक यांची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांना आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.

प्रतीक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. प्रतीक यांच्या उच्च शिक्षणासाठी २००४ मध्ये त्यांच्या वडिलांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे गेल्यावर प्रतीक अभिनय, नाट्यक्षेत्राशी जोडले गेले.

या काळात त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे बारावीत कमी मार्क्स मिळाले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्याने वडील नाराज झाले. २००७ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच, प्रतीकना ‘हमने जीना सिख लिया’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, ओम भुतकर यांच्याही भूमिका होत्या. त्यांचाही हा पहिलावहिला सिनेमा होता.

या अनुभवामुळे प्रतीक यांची अभिनय क्षेत्राविषयीची रुची अधिकच वाढवली आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा त्याचा संकल्प अधिकच मजबूत झाला. ज्यावेळी त्यांनी अभिनेता होण्याचा दृढ निश्चय केला, त्याचवेळी नेमकं कौटुंबिक दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

इंडस्ट्रीत ‘बॅक-डोअर एंट्री’ घेत प्रतीक यांनी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेत, २०११ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) मध्ये प्रवेश घेतला.

याच काळात त्यांना त्यांचे पहिले प्रेम मिळाले. मात्र आत्म-शंका आणि संभ्रमाच्या स्थितीत असल्याने हे नाते बहरण्यापूर्वीच संपुष्टात आले. हे वैयक्तिक नुकसानच संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात यश मिळवण्यासाठीचे एकमेव प्रेरणा स्त्रोत बनले.

The Entrepreneur Documentary-Pratik Shelar
Netflix Series चा 'हा' हिरो बनला जगातला सगळ्यात हॅंडसम पुरुष,जाणून घ्या भारतातून कोण आहे लिस्टमध्ये सामिल?

२०१६ मध्ये त्यांनी 'इंडियन मुव्ही फ्रेंड'ला तिकीट पोर्टलवरून मुव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रूपांतरित करण्याचे ठरवले. व महेश मांजरेकरांच्या 'ध्यानीमनी' हा पहिला मराठी चित्रपट जो भारतात सिनेमागृहांमध्ये आणि भारताबाहेर इंडियन मुव्ही फ्रेंडद्वारा डिजिटली एकाच वेळी प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा ठरला.

मात्र हा प्रयत्न फसला. या निर्णयाने त्यांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेले. आधीच इतका संघर्ष सहन केल्यानंतर, या नवीन आघाताने प्रतीक पूर्णपणे कोलमडले आणि तो आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. हे पाऊल टाकत असताना त्यांना त्यांच्या आईच्या आवाजाने धैर्याची आठवण करून दिली. काही या अनुभवतातून नैराश्येच्या गर्तेत जातात तर काही या सगळ्यावर मात करत, निर्भयपणे पुढे जातात.

एखाद्या फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी घ्यावी, अशी ते भरारी घेतात. अशीच भरारी घेतली. त्यांनी पुन्हा एकदा सर्व अडचणींविरुद्ध लढण्याचे ठरवले आणि २०१८ मध्ये नवीन उपक्रम 'गोविडो' जन्माला आला. मुख्य धारेतील हॉलिवूड आणि ब्रिटिश सिनेमा चित्रपटांसाठी एक गुंतवणूक व्यासपीठ.

२०२२ पर्यंत गोविडो प्लॅटफॉर्म वरून ऑस्कर, बाफ्टा अशा नामांकित पुरस्कार प्राप्त निर्मात्यांच्या १२ सिनेमांमध्ये तब्बल १५ करोड रुपयांची गुंतवणूक गेलेली आहे. त्यांनी 'इंडियन मुव्ही फ्रेंड'चे पुनरुज्जीवन केले आहे आणि फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ ला आमंत्रण मिळाले, जिथे त्याने आपले येणारे उपक्रम जगासमोर मांडले.

प्रतीक यांच्या जिद्दीची कहाणी असलेला 'द आंत्रप्रेन्युअर' हा माहितीपट गोविडो युट्यूबवर उपलब्ध असून लवकरच तो मुख्य प्रवाहातील हॉलिवूड सिनेमा बनत आहे.

The Entrepreneur Documentary-Pratik Shelar
Viral Video: ''बॉलीवूडमध्ये आपला 'उत्तराधिकारी' कोण?'', शाहरुख अन् सलमाननं कोणाचं नाव केलं फायनल?

आपल्या या प्रवासाबद्दल प्रतीक शेलार म्हणतात, '' हा प्रवास खूप आव्हानात्मक होता. अनेक चढउतार होते, मात्र या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मला अनेकांची मदत लाभली. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे सहकारी या सगळ्यांनीच मला सहकार्य केले.

इच्छाशक्ती असेल तिथे काहीच अशक्य नाही. अनेक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आपसूकच येते. मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो, आयुष्यात अशक्य काही नाही. फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा, मेहनतीची तयारी हवी आणि कधीही न्यूनगंड बाळगू नये.

कायम जिद्द बाळगावी, हेच सांगण्याचा प्रयत्न मी 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटातून केला आहे. मी केलेल्या चुका, मला आलेले वाईट अनुभव, त्यातून मी काय शिकलो हे सांगण्याचा प्रयत्न मी या माहितीपटातून केला आहे.''

आपण प्रतीक शेलार अथवा The Entrepreneur - A Documentary यूट्यूब वर सर्च करून हा माहितीपट पाहू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com