esakal | The Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी
sakal

बोलून बातमी शोधा

The Family Man 2 Cast

The Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

सध्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल 'नेटवर्क 18'ने एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये कलाकारांनी किती मानधन घेतले आहे हे सांगितले आहे. (The Family Man 2 Cast Fees Samantha Akkineni Manoj Bajpayee Ashlesha Thakur sharib hashmi)

'द फॅमिली मॅन 2' सीरिजमधील श्रीकांत तिवारी ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मनोज वाजपेयी यांनी 10 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा अक्‍क‍िनेनी हिने तीन ते चार कोटी रुपये मानधन घेतले आहे. या शोमध्ये श्रीकांत तिवारीची पत्नी सुचित्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियामण‍िने 80 लाख रुपये मानधन घेतले असून लवकरच ती अजय देवगण यांच्या 'मैदान' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का?

हेही वाचा: 'गोरेपणाला भाव देणाऱ्या प्रॉडक्टची जाहिरात नकोच'

'नेटवर्क 18' च्या रिपोर्टनुसार शारिब हाश्मी याने या वेब सीरिजसाठी 65 लाख रुपये एवढे मानधन घेतले आहे. यामध्ये मेजर समीर ही भूमिका करणारा अभिनेता दर्शन कुमार याने एक कोटी रुपये मानधन घेतले आहे. तसेच प्रसिद्ध कलाकर शरद केळकर याने 'द फॅमिली मॅन 2' वेब सीरिजसाठी 1.6 कोटी रूपये मानधन घेतले आहे. सीरिजमध्ये श्रीकांत तिवारी यांच्या मुलीची भूमिका साकारणारी कलाकार अश्‍लेषा ठाकूर हिने 50 लाख रुपये मानधन घेतले आहे.

हेही वाचा: सोनाली ते यामी.. धूमधडाका नाही तर साध्या विवाहाला पसंती देणाऱ्या अभिनेत्री