esakal | 'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणीचं मुस्तफाशी लग्न अवैध; पहिल्या पत्नीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणीचं मुस्तफाशी लग्न अवैध; पहिल्या पत्नीचा दावा

'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणीचं मुस्तफाशी लग्न अवैध; पहिल्या पत्नीचा दावा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रिया मणीचं मुस्तफा राजशी लग्न अवैध असल्याचा दावा आयेशानं केला आहे. आयेशा ही मुस्तफाची पहिली पत्नी आहे. मुस्तफा आणि आयेशा २०१३ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर २०१७ मध्ये प्रियामणीने मुस्तफा राजशी लग्नगाठ बांधली. मुस्तफा आणि आयेशा यांना दोन मुलं आहेत. (The Family Man actress Priyamanis marriage to Mustafa Raj is invalid his first wife alleges slv92)

"मुस्तफाचं माझ्याशी लग्न झालंय. त्याचं प्रिया मणीशी झालेलं लग्न अवैध आहे. आमचा अद्याप घटस्फोटसुद्धा झाला नाही आणि प्रिया मणीशी लग्न करताना त्याने कोर्टात अविवाहित असल्याचं म्हटलं होतं", असे आरोप आयेशाने मुस्तफावर केले आहेत. आयेशाचे सर्व आरोप मुस्तफाने फेटाळले आहेत. "माझ्याविरोधात केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मुलांच्या खर्चासाठी मी वेळोवेळी आयेशाला पैसे देतोय. तिला माझ्याकडून पैसे उकळायचे आहेत, म्हणून ती असे आरोप करतेय", असं तो म्हणाला.

हेही वाचा: Video : '३ वर्षे हाती काम नाही, डोक्यावर कर्जाचं ओझं'; 'जेके तळपदे'ची खास मुलाखत

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का?

अभिनेत्री प्रिया मणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दोन्ही भागात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. प्रिया मणीने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलंय. अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

loading image