esakal | 'द फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनवर आणा बंदी' - माहिती व प्रसारण मंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

the family man season 2

'द फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनवर आणा बंदी'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - वाद आणि वादाच्या आधारे संबंधित कलाकृतीवर बंदी आणण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. वर्षाच्या सुरुवातीला अनेक चित्रपट आणि वेबसीरिजवर बंदी घालण्याचे प्रकार दिसून आले आहेत. लक्ष्मी बॉम्ब, तांडव, ही त्या काही मालिकांची नावं सांगता येतील. त्यातील काही प्रसंगावर समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे तांडव ही मालिका ज्यावेळी प्रदर्शित झाली होती त्यानंतर काही दिवसांनी द फॅमिली मॅनचा दुसरा (the family man season 2) सीझनही प्रदर्शित होणार होता. पण तसे झाले नाही. (the family man season 2 controversy rajyasabha mp vaiko writes to prakash javadekar to ban serise )

जुनच्या पहिल्या आठवड्यात बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेला द फॅमिली मॅनचा (the family man season 2 ) दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. आता या सीझनच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी नेत्यानं केली आहे. त्या नेत्यानं यासंबंधी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar ) यांना पत्रही पाठवले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी अभिनित असलेल्या या मालिकेच्या दुस-या सीझनची प्रेक्षक मागील वर्षांपासून वाट पाहत आहेत. आता कुठे या मालिकेच्या दुस-या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला आहे.

अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणा-या या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करु नका. त्याच्यावर बंदी घाला. अशी मागणी त्या नेत्यानं केली आहे. त्यांनी यासंबंधी माहिती व सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे. त्यात या मालिकेत जे काही दाखविण्यात आले आहे त्याविषयी नाराजी व्य़क्त करण्यात आली आहे.

एमडीएमकेचे नेते वाईको (mp vaiko writes ) यांनी जावडेकरांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, या मालिकेत तमिळयन्सला निगेटि्व्ह पध्दतीनं दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेवर बंदी घालावी. वाईको यांनी 19 मे ला जावडेकर यांना पत्र पाठवले आहे. या मालिकेत तमिळियन्सला आतंकवादी आणि आयएसआय एजंट म्हणून दाखविण्यात आल्याचे त्या पत्रात म्हटले आहे.

loading image
go to top