The Family Man 2 Review: मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड समंथाची कामगिरी

जाणून घ्या, कसा आहे The Family Man 2 ?
the family man 2
the family man 2

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा 'द फॅमिली मॅन' The Family Man Season 2 या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रदर्शित झाली असून सोशल मीडियावर सध्या त्याची जोरदार चर्चा आहे. या सिझनमध्ये मुख्य भूमिका साकारत असलेल्या अभिनेता मनोज वाजपेयीसोबत Manoj Bajpayee दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीची Samantha Akkineni एंट्री झाली. समंथाची ही पहिलीच वेब सीरिज असून पदार्पणातच तिने दमदार कामगिरी केली आहे. (The Family Man Season 2 review and Manoj Bajpayee Samantha Akkineni)

काय आहे कथा?

या दुसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) आता नव्या नोकरीला लागला आहे. 'टास्क फोर्स'ची नोकरी सोडून तो ९ ते ५ वेळेतल्या कॉर्पोरेट कंपनीत काम करतोय. इतरांप्रमाणे तो या नोकरीत काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, मात्र त्याची जिद्द त्याला शांत बसू देत नाही. अखेर तो पुन्हा टास्क फोर्स जॉईन करतो आणि इथून दमदार कथानकाला सुरुवात होते. दुसरीकडे जे.के. तळपदेला (शारिब हाश्मी) चेन्नईमध्ये ओलीस ठेवण्यात आलंय. चेन्नई, मुंबई, उत्तर श्रीलंका, लंडन अशा विविध ठिकाणांमध्ये कथा फिरत आहे. श्रीलंकन तमिळ बंडखोर आणि ISI या पार्श्वभूमीवर एलटीटीईशी संबंधित ही नवी कथा आहे. त्यांचं मिशन मोडून काढण्यासाठी श्रीकांत तिवारी आणि जे. के. पुन्हा तयारीला लागले आहेत.

पहिल्या सिझनचा शेवट

या सीरिजच्या पहिल्या सिझनची कथा उत्तर भारतात घडलेली दाखवली आहे तर आता दुसऱ्या सिझनची कथा ही दक्षिण भारतात घडताना दाखवली आहे. दिल्लीतल्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न अतिरेकी करत असतात आणि त्यात त्यांना यश मिळतं की नाही, अशी प्रचंड उत्सुकता ताणत पहिलं सिझन संपतं. याचं उत्तर प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनमध्ये मिळेल, मात्र त्यासाठी हा सिझन पाहणं महत्त्वाचं आहे.

the family man 2
'द फॅमिली मॅन २'मध्ये आसिफ यांना पाहून चाहते भावूक; सहा महिन्यांपूर्वी केली होती आत्महत्या

मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड समंथा

दुसरा सिझन प्रदर्शित होण्यापूर्वी समंथा आणि तिच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून फार टीका झाली होती. मात्र समंथाने अत्यंत दमदार अभिनय केलं आहे. तमिळ बंडखोराची भूमिका तिने साकारली असून राजी असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. तिच्या भूमिकेला नकारात्मक छटा असल्या तरी कथेत ती प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. संपूर्ण सिझनमध्ये तिने अभिनयाची पकड मजबूत ठेवली असून काही ठिकाणी ती मनोज वाजपेयीपेक्षाही दमदार कामगिरी करताना दिसते.

कोणता सिझन अधिक चांगला?

अनेकदा वेब सीरिजचा दुसरा सिझन फारसा गाजत नाही, असं पाहायला मिळतं. पण द फॅमिली मॅन २ च्या बाबतीत ही गोष्ट पूर्णपणे खोटी ठरते. पहिला सिझन न पाहिलेले प्रेक्षकसुद्धा दुसऱ्या सिझनशी कनेक्ट होतील. मात्र मनोरंजनाच्या बाबतीत पहिला सिझन अधिक चांगला असल्याचं जाणवतं. दुसऱ्या सिझनमध्ये काही ठिकाणी कथा संथ गतीने जाताना दिसते, तर काही गोष्टींचा अंदाज प्रेक्षकांना आधीच येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com