
The Grey Man Dhanush : 'फक्त साऊथचा नाही तर भारताचा कलाकार'
The Grey Man News: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ज्या अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा आहे. ज्याच्या भूमिकेचे कायम कौतूक केले जाते त्या धनुषला सोशल मीडियावरुन मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. धनुष हा आता द ग्रे मॅनमधून (Tollywood Actor Dhanush) हॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये त्याचा प्रिमिअर पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. धनुषचं हॉलीवूडमध्ये जाणं हे त्याच्या चाहत्यांसाठी कौतूकाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलेल्या धनुषनं (Entertainment Trending News) सध्या बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड यावर प्रतिक्रिया दिली आहे.
टॉलीवूडचा अभिनेता किच्चा सुदीप आणि अजय देवगण यांच्यात वादाला सुरुवात (Bollywood Movies) झाली होती. अजय तेव्हा त्याच्या रन वे 34 चित्रपटाचे प्रमोशन करत होता. हिंदी की दाक्षिणात्य भाषा यावरुन रंगलेल्या त्या वादात बॉलीवूड, टॉलीवूडमधील वाद रंगला होता. त्यात करण जोहर, शाहरुख पासून कमल हासन यांच्यापर्यत सगळ्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून जे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात सर्वाधिक लोकप्रियता ही टॉलीवूडच्या वाट्याला आली आहे. दुसरीकडे बॉलीवूडची तुलना ही सातत्यानं टॉलीवूडशी केली जात आहे.
यासगळ्या पार्श्वभूमीवर धनुषनं दिली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तमिळ चित्रपटांमध्ये धनुषनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुसो ब्रदर्स यांनी दिग्दर्शित केलेल्या द ग्रे मॅनमध्ये तो सह कलाकार म्हणून काम करत आहे. धनुषच्या द ग्रे मॅननं लक्ष वेधून घेतले आहे. ख्रिस इवान्स आणि धनुषच्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. मला केवळ साऊथचा कलाकार म्हणून ओळखलं जावं अशी माझी इच्छा नाही. असं धनुषचं म्हणणं आहे.
हेही वाचा: Viral Video: Aaradhya Bachchan मुळे ऐश्वर्या-अभिषेकची पंचाईत, मीडियासमोरच..
द ग्रे मॅनमध्ये धनुषनं द लोन वुल्फची भूमिका वठवली आहे. बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड या वादावर तो म्हणतो, आपल्याकडे अशाप्रकारचा वाद होणं हे दुर्देवी आहे. मी फक्त साऊथचा नाहीतर पूर्ण देशाचा आहे. मला भारतातील कलाकार म्हणून घ्यायला आवडेल. सकुंचित विचार हे आपल्याला नेहमीच मागे खेचतात. हे टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असं धनुषनं म्हटलं आहे.
हेही वाचा: Video: 'रंजना'मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!!
Web Title: The Grey Man Actor Dhanush Comment On Hollywood Vs Bollywood I Am Indian Actor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..