Kapil Sharma Commedy Show: अर्चना सिंगचा मुक्काम हलणार? कुणाला मिळणार खुर्ची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Sharma Commedy Show

Kapil Sharma Commedy Show: अर्चना सिंगचा मुक्काम हलणार? कुणाला मिळणार खुर्ची?

The Kapil Sharma Show: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेतील बातमी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कोरोनाच्या काळात देखील या मालिकेचा टीआरपी मोठा होता. त्याच्या रिपिट टेलिकास्टला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला होता. आता या मालिकेतील एक प्रसिद्ध सेलिब्रेटीवर अलविदा म्हणण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे.

अर्चनाची कपिलच्या कॉमेडी शोमधून खुर्ची जाणार असल्याचे ऐकताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळया चर्चेला उधाणही आले आहे. कपिलनं याविषयावरुन अर्चनाची फिरकी घेतली होती. त्यावर अर्चनानं काय प्रतिक्रिया दिली आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कपिलनं तर यापुढील काळात अर्चना तुझ्या खुर्चीला येत्या काळात एका अभिनेत्रीकडून मोठा धोका असणार हे बोलून दाखवले आहे.

अभिनेत्री काजोल ही तिच्या सलाम वेंकी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिच्यासोबत विशाल जेठवा आणि रेवतीही होत्या. कपिलनं या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत जाम धमाल केली होती. कपिलनं काजोलची फिरकी घेतली होती. तिला वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराणही केले होते. त्यावेळी काजलचं हसणं पाहून येत्या काळात मला जर कुणाचे चँलेंज असेल तर ते काजोलचे आहे. अशी प्रतिक्रिया अर्चनानं दिली होती.

अर्चनाला एक गोष्ट पक्की माहिती आहे ती म्हणजे केवळ काजोल ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या खुर्चीला धोक्यात आणू शकते. वास्तविक एका चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी जेव्हा काजोल अजय सोबत प्रमोशनसाठी आली होती तेव्हा अर्चनानं ही गोष्ट काजोलला बोलून दाखवली होती.