The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय मांडलेकर नाराज Chinmay mandlekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinmay Mandlekar

The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय मांडलेकर नाराज

'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमा सध्या भारतभर जोरदार चर्चेत आहे. फारसं प्रमोशन न करताही केवळ सिनेमातील सत्य घटनाक्रम आणि दर्जेदार कलाकारांचे अभिनय यामुळे आज प्रत्येकाला 'द काश्मिर फाईल्स' पाहायची इच्छा आहे. या सिनेमात मराठमोळे चेहरे आपल्याला आकर्षून घेत आहेत ते म्हणजे पल्लवी जोशी,मृणाल कुलकर्णी,चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar). या सिनेमात चिन्मय मांडलेकरनं काश्मिरी दहशतवादी साकारलाय. त्याचं नाव आहे फारुख मलिक उर्फ बिट्टा. त्यानं साकारलेला बिट्टा खूप मेहनतीतनं घडलाय असं चिन्मयनं एका मुलाखतीतनं सांगितलं आहे.

ही भूमिकेसाठी पल्लवी जोशीनं आपलं नाव सुचवलं होतं. पण तरिही स्क्रीन टेस्ट,ऑडिशन,स्क्रीप्ट वाचन अशा सगळ्या सोपस्कारातून आपल्याला जावं लागलं हे देखील त्यानं नमूद केलं. ही भूमिका उत्तम वठावी म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खूप सहकार्य केल्याचंही तो म्हणाला.काही सिनेमागृहात चिन्मय मांडलेकरनं साकारलेल्या बिट्टाच्या तोंडचे संवाद म्यूट करून दाखवण्यात येत आहेत. त्यावर बोलताना त्यानं नाराजी दर्शवली. तो म्हणाला,''त्या संवादांमुळे वाद होतील असं त्यात काहीच नाही. पण तरिही ते म्युट करून का दाखवण्यात येत आहेत हे कळत नाही. असं करणं खरंच चुकीचं आहे. मी त्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या संवादानी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या नसत्या''. असं चिन्मयनं आवर्जुन त्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

''बिट्टा ही दहशतवादी भूमिका साकारण्यासाठी आपण खूप व्हिडीओ पाहिले. बिट्टाचेही काही जुने व्हिडीओ पाहिले. मी ते वारंवार पाहायचो. त्यासंदर्भातील काही कागदपत्रही वाचली आहेत. त्यामुळेच मी ती भूमिका साकारू शकलो'' असं चिन्मय म्हणाला आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदींनीही हा सिनेमा पाहून त्याचं जाहिरपणे कौतूक केलं आहे.