The Kashmir Files: रिलीजच्या एक दिवस अगोदरच तो सीन हटवला|The kashmir Files court restrains scenes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kashmir Files

The Kashmir Files: रिलीजच्या एक दिवस अगोदरच तो सीन हटवला

Bollywood Movies : बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेचा विषय असणारा चित्रपट म्हणजे द काश्मिर फाईल्स. (The Kashmir Files) प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. आज हा चित्रपट (Bollywood Actress) प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक दिवस या चित्रपटातील तो सीन हटविण्यात आला आहे. काश्मिर पंडितांचा विषय चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोशल मीडियावर द काश्मिर फाईल्सची जोरदार चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

काश्मिर फाईल्समध्ये दिवंगत आयएएफ स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना यांच्यावर आधारित दृश्यांवर संशोधन करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डानं दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मिर फाईल्स हा चर्चेत आला आहे. या प्रकरणावरुन यापूर्वी दिवंगत रवि खन्ना यांच्या पत्नी निर्मला यांनी कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या पतीविषयक जी दृष्ये चित्रित करण्यात आली आहे ते हटविण्याची मागणी केली आहे. सत्य परिस्थितीशी तडजोड करुन काल्पनिकतेचा आधार घेऊन मनोरंजकता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा आरोप निर्मला यांनी केला आहे.

हेही वाचा: बेसन, मोतीचुराच्या लाडवाची लावली वाट! मिल्कशेकचा Video Viral

चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले आहे. स्क्वाड्रन लिडर रवि खन्ना हे 25 जानेवारी 1990 मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मु काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

Web Title: The Kashmir Files Court Restrains Scenes Ravi Khanna Movie Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top