प्रतीक्षा संपली! 'द काश्मीर फाइल्स' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित | OTT | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kashmir Files

प्रतीक्षा संपली! 'द काश्मीर फाइल्स' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

The Kashmir Files : अवघ्या काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धमाकेदार कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची आणि त्यांच्या निर्गमनाची वेदनादायक कहाणी दाखवण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. विवेक अग्निहोत्रीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ओटीटीवर 'द काश्मीर फाइल्स'च्या आगमनाविषयी सांगितले आहे.

'द काश्मीर फाइल्स' आता OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज होणार आहे. मात्र, हा चित्रपट कधी येणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. OTT वर चित्रपट प्रदर्शित झाल्याची बातमी समोर आल्यापासून, चित्रपटाच्या सुरुवातीला स्ट्रीमिंग भागीदार म्हणून उल्लेख केलेल्या ZEE5 वर प्रदर्शित होईल असा अंदाज बांधला जात होता. दरम्यान, झी नेटवर्कने या चित्रपटाचे टीव्ही हक्कदेखील घेतले असून, हा चित्रपट मे महिन्यात टीव्हीवर प्रसारित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

'द काश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला हा चित्रपट अवघ्या 25 कोटींमध्ये बनला असून, या चित्रपटाने एका महिन्यात बॉक्स ऑफिसवर 248.68 कोटींची कमाई केली आहे. 'द काश्मीर फाइल्स' ला देशभरात मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. मात्र, चित्रपटाच्या विषयावरून बराच वाद झाला होता.

Web Title: The Kashmir Files Now To Be Released On Zee5

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..