दिल्लीनं केलं भारताचं वाटोळं! काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाचं धक्कादायक वक्तव्य|The Kashmir Files Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the kashmir files

दिल्लीनं केलं भारताचं वाटोळं! काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाचं धक्कादायक वक्तव्य

The Delhi Files: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) यांनी आता (The Kashmir files) आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचे नाव द दिल्ली फाईल्स असे असणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. अग्निहोत्री )(Bollywood Movies) यांचे काय म्हणणे आहे हे एएनआयनं देखील ट्विट करुन सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी दिल्ली शहरावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. ते सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल झालं आहे. अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये (social media viral news) दिल्ली फाईल्स हा चित्रपट तुम्हाला तामिळनाडू मध्ये काय झाले याविषयी सुद्धा सांगेल. हा चित्रपट केवळ दिल्लीविषयी नाही तर या शहरानं देशाचं किती वर्षापासून देशाचे नुकसान केले हे सांगणारं आहे. असे अग्निहोत्री यांनी म्हटलंय.

विवेक अग्निहोत्री यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे. अग्निहोत्री आता काश्मीर फाईल्सच्या यशानंतर दिल्ली फाईल्स नावाचा चित्रपट तयार करणार आहे. त्याच्या प्री प्रॉडक्शनला आता सुरुवातही झाली आहे. अग्निहोत्री म्हणतात, आपण जो इतिहास सांगतो त्याला पुरावे हवेत. विनापुरावा इतिहासाची मांडणी करण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे राजकीय हेतुपोटी वेगळ्या अर्थानं इतिहासाची मांडणी करण्यात आली होती. त्याचा मोठा तोटा आपल्याला झाला. अजुनही आपण काही गोष्टी गांभीर्यानं स्विकारत नाही. पाश्चिमात्य देशांचा छुपा अजेंडा हा आपल्या इतिहासातून डोकावतो. हे आपल्या लक्षात येत नाही. अजुनही आपल्यावर कोणत्या विचारांचे आक्रमण होते. याचा विचार आपण करण्याची गरज आहे.

हेही वाचा: Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्सनं आतापर्यत सोशल मीडियावर मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं तीनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. काश्मीरी पंडितांच्या वाट्याला आलेला संघर्ष, त्यांच्या वेदना या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. काश्मीर फाईल्सला मिळालेल्या राजकीय रंगामुळे त्याच्या वाट्याला लोकप्रियता अधिक आल्याचे दिसून आले. देशातील सत्ताधारी पक्षानं हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा असे आवाहन काही नेत्यांनी केले होते. देशातील अनेक राज्यांमध्ये काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आल्याचे दिसून आले होते. यापूर्वी काही राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली होती.

हेही वाचा: Fabulous Life of Bollywood Wives-2 च्या दुसऱ्या पर्वाचं चित्रीकरण पूर्ण

Web Title: The Kashmir Files Vivek Agnihotri Delhi Files Movie Controversial Statement Viral Ani Tweets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..