Adah Sharma at Lalbaugcha Raja: अदा शर्माने लालबागच्या राजाच्या चरणी केला शंखनाद, व्हिडीओ व्हायरल

अदा शर्मा आज सकाळी लालबाग राजा चरणी लीन झालीय
'The Kerala Story' Adah Sharma visited Lalbaugcha Raja in Mumbai and seek blessings
'The Kerala Story' Adah Sharma visited Lalbaugcha Raja in Mumbai and seek blessings SAKAL

Adah Sharma at Lalbaugcha Raja: लालबागचा राजा हा फक्त मुंबईकरांचा नाही तर तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत. लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी तमाम भाविक भक्त तासन् तास रांगेत उभे असतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा हजेरी लावत असतात.

अशातच 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने मुंबईत लालबागच्या राजाला भेट देऊन गणपतीचे आशीर्वाद घेतले. इतकंच नव्हे अदा शर्माने गणपती चरणी शंखनाद केला.

('The Kerala Story' Adah Sharma visited Lalbaugcha Raja in Mumbai and seek blessings)

'The Kerala Story' Adah Sharma visited Lalbaugcha Raja in Mumbai and seek blessings
Journey Trailer: हरवलेल्या मुलाला शोधणाऱ्या आई - बाबांची रहस्यमयी कहाणी, 'जर्नी'चा ट्रेलर प्रदर्शित, शंतनु मोघेंची प्रमुख भुमिका

अदा शर्मा लालबाग चरणी लीन

आज शुक्रवारी सकाळी अदा लालबाग राजाच्या चरणी लीन झालीय. अदाने अस्सल पारंपरिक साडी परिधान केला होती. गुलाबी रंगाची साडी नेसून अदा लालबाग राजाच्या दर्शनाला गेली होती.

अशातच अदाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत अदाने लालबाग राजाच्या चरणी शंखनाद केलाय. अदाने शंख हाती घेऊन भक्तीभावाने लालबाग राजाच्या चरणी शंखनाद केलाय.

शाहरुख खानची मुलासोबत लालबाग राजा चरणी हजेरी

किंग खान शाहरुखचा मुलगा अब्राम, मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होते. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाहरुखचं स्वागत करुन त्याचा सत्कार केल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणेश चतुर्थीच्या निमित्तानं बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी गर्दी केली होती. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यापासून वरुण धवन पर्यत कित्येकांनी हजेरी लावली होती.

लालबाग राजा चरणी लाखोंचं दान

देशासह राज्यात देखील गणेशोत्सवाला मोठ्या उत्सहात सुरूवात झाली आहे. यादरम्यान मुंबईतील लालबागच्या राज्याच्या चरणी भरभरून दान आलं आहे. या दानाची मोजदाद केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २५ लाखांहून अधिक भाविकांनी लालबागच्या राज्याचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावेळी भक्तांनी लाखो रुपये किमतीचे दान गणरायाच्या चरणी अर्पण केले असून याच्या मोजणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com