The Kerala Story BO Collection: आता द्विशतक दूर नाही! द केरळ स्टोरीनं 12 दिवसात कमावले किती कोटी?

The Kerala Story Box Office Collection Day 12
The Kerala Story Box Office Collection Day 12Esakal

रिलीजच्या अगोदरच वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' हा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. रिलिजपुर्वीच या चित्रपटाला विरोध आणि बंदीची मागणी होत होती.

मात्र तरी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबुत केली आहे. दररोज चित्रपटाच्या कमाईचे आकडे काही नवीन विक्रम करत आहेत.

केरळ स्टोरीने १०० कोटींनंतर १५० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने १२ दिवसांत किती कमाई केली ह पाहुया..

The Kerala Story Box Office Collection Day 12
Manushi Chhillar Cannes: जेव्हा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचली भारताची 'सिंड्रेला'! पाहून लोकही झाले शॉक..

रिपोर्टनुसार, सुदीप्तो सेनच्या  द केरळ स्टोरीने 12 व्या दिवशी 9.80 कोटी कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि 156.84 कोटी कमावले आहेत. या आकड्याबरोबरच आता हा चित्रपट 2023 च्या वर्षातील 5 वा सर्वात मोठा ओपनर बनला आहे.

The Kerala Story Box Office Collection Day 12
Cannes 2023: गळ्यात मगरीचं पिल्लू लटकवून कान्समध्ये पोहचली उर्वशी! पाहून नेटकरीही...

बारा दिवसाच्या कमाईबद्दल बोलायच झालं तर, पहिल्या दिवशी  'द केरळ स्टोरी'ने 8.03 कोटींची ओपनिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी, त्यानंतर तिसऱ्या दिवशी 16.4 कोटी, चौथ्या दिवशी 10.07 कोटी आणि पाचव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे.

सहाव्या दिवशी, सातव्या दिवशी 12.5 कोटी तर आठव्या दिवशी 12.23 कोटी, नवव्या दिवशी 19.50, 10व्या दिवशी 23.75 कोटी, 11व्या दिवशी 10.3 कोटी कमावले आहेत.

The Kerala Story Box Office Collection Day 12
Amitabh Bachchan Video: 'उन लई वाढलय म्हणुन तो त्याचा..', बिग बींनी शेअर केला 'त्या' व्यक्तीचा व्हिडिओ...

'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com