The Kerela Story Twitter Review: द केरळ स्टोरी पहायचा की नाही? ट्विटरवर दोन टोकाच्या दोन प्रतिक्रिया!

The Kerala Story
The Kerala Story Esakal

The Kerela Story Twitter Review: 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. रिलिज पुर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटावरुन प्रेक्षकांचे दोन भाग बनलेले आहेत. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही बरिच चर्चा सुरु झाली.

काहीजण याला वादग्रस्त आणि अपप्रचार म्हणत आहेत. यातुन चुकिचा प्रोपगंडा पसरवण्याच काम करण्यात येत आहे. असंही म्हटलं जात आहे. पण आता हा हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला.

आता प्रेक्षकांची या चित्रपटावर प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षकांनी ट्विटरच्या माध्यमातुन आपलं मत माडलं आहे.

5 मे रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला. या चित्रपटाबद्दल लोकांनी आतापासूनच आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर KeralaStory हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

एकाने लिहिलयं की, '#TheKerelaStory या हॅशटॅगसह लिहिले की हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.मी प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहण्याची आणि जनजागृती करण्याची शिफारस करतो.. @विपुलअलशाह जी आणि @sudiptoSENTlm एवढा बोल्ड चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद देखील केले आहे. '

तर दुसऱ्याने लिहिलयं की, सत्य लपविण्याच्या एक केविलवाणा आणि फसवा प्रयत्न करुन देखील YouTube वर मोठ्या प्रमाणावर #TheKerelaStory ट्रेण्ड व्हायरल होत आहे. ज्याने याचा पुरावा दिला आहे की त्यांना भीती वाटते की आता हिंदू जागे झाले आहेत. कृपया आजच जा आणि #KeralaStory पहा आणि त्याला ब्लॉकबस्टर बनवा.

The Kerala Story
Prasad Khandekar Birthday: 'ती' घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर 'हास्यजत्रा' नाही तर IPL गाजवत असता..

तर एकानं लिहिलयं की, '#TheKeralaStory ही अस्वस्थ करणारी, द्वेष आणि विसंवाद पसरवणारी कथा आहे. हे धोकादायकपणे हिंसक, देशात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक दृश्यांनी भरलेले आहे. या अजेंडा आधारित चित्रपटासाठी एकच स्टार ..

मला हे समजत नाही की सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या पास कसं केले, अगदी A प्रमाणपत्रासह. हे बेजबाबदार आणि त्यांच्या कर्तव्यापासून अक्षरशः फसवणूक आहे.

दिग्दर्शक #सुदिप्तोसेन हिंदू मुलींच्या इस्लामिक धर्मांतराच्या नावाखाली विष पसरवत आहेत. कथेचा भाग खरा आहे पण ती मांडणी पुर्णपणे विषारी प्रवृत्तीची आहे.

आश्चर्य वाटले की #VipulAmrutlalSha हे फक्त या #KerlaStory चे निर्माते नाहीत तर प्रोजेक्टचे क्रिएटिव्ह डायरेक्टर देखील आहेत. त्याची ही आवृत्ती पाहून वाईट वाटले. आणि सिनेमाच्या पडझडीने निराश झालो.केरळ कथा तुमचा वेळ आणि पैशाला पात्र नाही.'

'The Kerala Story' !!!मी उत्साही आहे तसेच घाबरलो आहे! आम्ही #GandhiVsGodse सारख्या काही चित्रपटांबद्दल ऐकले आहे ज्यात ट्रेलर चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. शेवटी बॉलीवूडची ‘डावी’ विचारसरणी सर्वांनाच माहीत आहे.

The Kerala Story
Kanwar Chahal Passed Away: शेहनाज गिल सोबत काम करणारा पंजाबी गायक कंवर चहलचं निधन

विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर आणतो. ज्यात अदा शर्मा मुख्य भुमिकेत आहे.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com