The Kerala Story : 'काश्मीर फाईल्स ते द केरळ स्टोरी', कमी खर्चात बॉक्स ऑफिसवर उडवला धुराळा! जास्त कमाई केली कशी?

अनुपम खेर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका असलेल्या द काश्मिर फाईल्सची गोष्टच वेगळी होती.
The Kerala Story uri to The Kashmir Files Bollywood
The Kerala Story uri to The Kashmir Files Bollywood

The Kerala Story uri to The Kashmir Files bollywood : द काश्मिर फाईल्सच्यावेळी देशभरामध्ये काय वातावरण होते हे अनेकांना माहिती आहे. आता द केरळ स्टोरीच्यावेळी देखील सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. उरी जेव्हा प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. काश्मिर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. उरीनंही वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. यासगळ्यात केरळ स्टोरीची घोडदौड सुरु झाली आहे.

काश्मीर फाईल्स,उरी, कहानी, आशिकी २, तनु वेड्स मनू आणि आता द केरळ स्टोरी या चित्रपटांच्याबाबत बोलायचे झाल्यास या चित्रपटांचे असणारे बजेट कमी होते. मात्र त्यांनी केलेली कमाई हा चर्चेचा विषय होता. आता केरळ स्टोरीनं अवघ्या चार दिवसांत पन्नास कोटींची कमाई करुन अनेकांना धक्का दिला आहे. भलेही यातील काही चित्रपटांवरुन वाद झाला असेल मात्र त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. आपण बॉलीवूडमधील त्या चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे बजेट कमी होते पण त्यांनी दिलेली फाईट मोठी होती.

केरळ स्टोरी -

या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांत ३५ कोटींची कमाई केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट ३५ ते ४० कोटींमध्ये तयार झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं जर ४० कोटींचा टप्पा पार केला असेल तर मग हा चित्रपट शंभर कोटींपर्यत जाण्याची शक्यता असल्याचे अनेक ट्रेंड अॅनलिस्टचे म्हणणे आहे. केरळ स्टोरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये कुणीही मोठा सेलिब्रेटी नाही. नवख्या कलाकारांना घेऊन दिग्दर्शकानं त्या चार मुलींची गोष्ट सांगितली आहे.

कहानी -

देशातल्या सर्वात प्रभावी अभिनेत्रींमध्ये विद्या बालनचे नाव घेतले जाते. २०१२ च्या दरम्यान महिला अभिनेत्री केंद्रित चित्रपट तयार होण्याचे प्रमाण कमी होते. कहानीची बाब जरा वेगळी होती. २३ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जगभरातून १०४ कोटींची कमाई केली होती.

आशिकी २ -

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आयकॉनिक लव स्टोरीचं बजेट हे १५ ते २० कोटीं रुपये होते. मात्र त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. अरिजित सिंगच्या आवाजातील त्या गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं जगभरातून १०९ कोटींची कमाई केली होती. भारतातून या चित्रपटानं ७८ कोटींची कमाई केली होती.

एक विलेन -

रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला एक व्हिलन नावाचा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. ३९ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं भारतामध्ये १०५ कोटींची कमाई केली होती. जगभरातून कमाईचा आकडा १५३ कोटींचा होता. रितेश देशमुखची त्या चित्रपटातील भूमिका लोकप्रिय झाली होती.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019)

विकी कौशलच्या फिल्म लाईफमध्ये उरी चित्रपटाचा वाटा महत्वाचा आहे. २०१९ मध्ये आलेल्या या चित्रपटानं त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. त्याची लोकप्रियता साऱ्या देशभरामध्ये कमालीच्या वेगानं वाढली. असं म्हटलं जातं की, उरीचे बजेट २५ कोटी रुपयांचे होते. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटानं एकट्या भारतातून २४५ कोटींची कमाई केली होती. तर जगभरातून आलेल्या कमाईचा आकडा ३३८ कोटी इतका होता.

The Kerala Story uri to The Kashmir Files Bollywood
The Kerala Story उत्तर प्रदेश मध्ये झालाय टॅक्स फ्री, योगी आदित्यनाथ यांची महत्वपूर्ण घोषणा

द कश्मीर फाइल्स (2022)

अनुपम खेर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका असलेल्या द काश्मिर फाईल्सची गोष्टच वेगळी होती. या चित्रपटामुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावऱण पुर्णपणे ढवळून निघाले होते. अवघ्या पंधरा ते वीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं देशभरातून २५० कोटींची कमाई केली होती. तर जगभरातून ३४० कोटींची कमाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com