Netflix Web Serise : जगातील ३६ देशांमध्ये शंभर दिवस टॉप १० मध्ये आहे 'ही' भारतीय वेबसीरिज!

सोशल मीडियावरही त्या मालिकेला (Netflix Web Serise ) अन् त्यातील सहभागी कलाकारांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
The Railway Man news
The Railway Man news esakal

The Railway Man Blockbuster On Netflix : ओटीटी मनोरंजन विश्वात आतापर्यत वेगवेगळ्या सीरिज, चित्रपट आणि माहितीपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या एका मालिकेनं प्रेक्षकांना थक्क करुन सोडले होते. ती मालिका १०० दिवस ३६ देशांमध्ये टॉप १० मध्ये असल्याचे दिसून आले आहे.

१९८४ मध्ये भोपाळ मध्ये जे घडलं त्यामुळे मोठा अनर्थ घडला होता. त्यानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. नेटफ्लिक्सवरुन ती सीरिज स्ट्रीम झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही प्रचंड होता. आता या मालिकेनं एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

नेटफ्लिक्सवरील या मालिकेचं नाव आहे द रेल्वे मॅन... १९८४ मध्ये भोपाळ मध्ये जी वायुगळती झाली होती त्या मध्ये हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. युनियन कार्बाइड फॅक्ट्रीमधून एका विषारी वायुची गळती झाली होती. त्यामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर ही मालिका प्रदर्शित झाली होती.

भोपाळ गॅस ट्रॅजेडी घटनेवर आधारित द रेल्वे मॅन नावाच्या मालिकेमध्ये आर माधवन, के के मेनन, बाबिल खान, दिव्येंदू शर्मा सारखे कलाकार होते. आता नेटफ्लिक्सनं त्यांच्या ऑफिशियल इंस्टा अकाउंटवरुन खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, एका वेगळ्या साहस अन् धैर्याची कहाणी असणाऱ्या द रेल्वे मॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. १०० दिवसांत टॉप १० मालिकांमध्ये रेल्वे मॅनचा समावेश करण्यात आला आहे.

The Railway Man news
Laaptaa Ladies Review : 'बायको हरवली म्हणून कुणी...' किरण रावचा 'लापता लेडिज' नेमकं काय सांगू पाहतोय?

आपल्या वेबसीरिजच्या वाट्याला एवढा मोठा मिळाला आहे हे ऐकून रेल्वे मॅनच्या सर्व कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यात अभिनेत्यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केला. प्रेक्षकांना आमच्या भूमिकेतून त्या गोष्टीची वेदना कळली हे सगळ्यात महत्वाचे. त्यांच्याकडून मिळालेली पोचपावती हीच मोठी गोष्ट. अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

The Railway Man news
The Indrani Mukerjea Story Review: असा 'डॉक्युड्रामा' यापूर्वी कधीही पाहिला नसेल, वेगवेगळी 'रहस्यं' तुम्हाला देतील धक्का!

भोपाळमध्ये जे काही घडलं होतं त्याबद्दल साऱ्या जगानं हळहळ व्यक्त केली होती. अजुनही त्याविषयी काही ना काही बोललं जातं. या मालिकेच्या निमित्तानं जे घडलं होतं त्याच्या पडद्यामागची गोष्ट काय होती हे दाखविण्याचा आणि भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये म्हणून काय काळजी घ्यावी याचाही विचार करण्यात आला आहे. असेही मेकर्सनं म्हटले आहे. आता या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com