'अतरंगी रे' चित्रपटाच्या शुटींगसाठी 'ही' तीन शहरं झाली निश्चित, वाचा बातमी सविस्तर

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क
मंगळवार, 28 जुलै 2020

मदुराईमध्ये दुसरे शेड्युल्ड होणार आहे. त्यानंतर दिल्ली व मुंबई असे शूटिंग पार पडणार आहे. अक्षय कुमारबरोबरच या चित्रपटात सारा अली खान आणि साऊथचा स्टार धानुष यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मुंबई ः निर्माते व दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या 'अतरंगी रे' या चित्रपटाचे एक शैड्युल्ड वाराणसी येथे पार पडले आणि आता लाॅकडाऊननंतर ते चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात करणार आहेत. या वेळी ते तीन शहरात चित्रीकरण करणार आहेत. तेथील ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत.

लाॅकडाऊनमध्ये ठरलं लिटल चॅम्पस कार्तिकी गायकवाडचं लग्न; वाचा सविस्तर...

मदुराईमध्ये दुसरे शेड्युल्ड होणार आहे. त्यानंतर दिल्ली व मुंबई असे शूटिंग पार पडणार आहे. अक्षय कुमारबरोबरच या चित्रपटात सारा अली खान आणि साऊथचा स्टार धानुष यांच्या मुख्य भूमिका आहेत. आनंद एल राय पहिल्यांदाच ब्लॉकबस्टर अभिनेता अक्षय कुमारला दिग्दर्शित करणार आहेत. सध्या अक्षय 'बेल बाॅटम' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

'मदर इंडिया' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

ते चित्रीकरण आटोपले की तो हा चित्रपट पूर्ण करणार आहे. याबाबत आनंद एल राय म्हणाले, “या लॉकडाऊन दरम्यान मी 'अतरंगी रे'च्या पुढील वेळापत्रकांची तयारी करीत होतो. ज्या ज्या ठिकाणी चित्रीकरण करायचे आहे ती लोकेशन्स आणि तेथील परवानगी घेण्याचे काम आता सुरू करीत आहोत. आरोग्याच्या सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन पुढचे वेळापत्रक सुरू करण्यास मी खूप उत्सुक आहे.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These three cities were definitely set for the shooting of 'Atarangi Re', read the news in detail