'माझ्या लग्नाला कुणी पैसे दिलेत का?; नुसरत जहॉ संतापली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माझ्या लग्नाला कुणी पैसे दिलेत का?;  नुसरत जहॉ संतापली...
'माझ्या लग्नाला कुणी पैसे दिलेत का?; नुसरत जहॉ संतापली...

'माझ्या लग्नाला कुणी पैसे दिलेत का?; नुसरत जहॉ संतापली...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेती आणि खासदार नुसरत जहॉ पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं ट्रोलर्सला चांगलचं खडसावलं आहे. दरवेळी तिला तिच्या लग्नावरुन बोललं जातं, त्यावरुन चिडवले जाते, एवढचं नाहीतर तिच्या मुलावरुन त्याचे वडिल कोण यावरुनही नेटकऱ्य़ांनी तिला खालच्या पातळीवर जावून आरोप केले होते. यासगळ्याचा नुसरतला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे तिनं सांगितलं. यावेळी तिनं एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. आपल्याला विनाकारण ट्रोल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असं नुसरतनं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नुसरत ट्रोल झाली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचं लग्न. तिनं पहिला प्रेमविवाह केला. दुसराही प्रेमविवाहच आहे. यावेळी तिला ट्रोल करण्यात आला आहे. आपल्या लग्नाच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना नुसरतनं खडसावलं आहे. नुसरत ही एक अभिनेत्री आणि आता तृणमुल कॉग्रेसची खासदार आहे. इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं की, मी माझी सर्व कागदपत्रे माझ्या स्वाक्षरीसह सरकारकडे जमा केली आहे. यापूर्वी मी माझी खरी माहिती दिली आहे की नाही यावरुन विचारणा केली जात होती. त्यावर मला सांगावेसे वाटते की, मी जी माहिती सांगितली ती खरी आहे.

नुसरतनं सुरुवातीला निखील जैनशी तुर्कीमध्ये 19 जून 2019 मध्ये लग्न केलं. ते नोव्हेंबर 2020 मध्ये वेगळे झाले. गेल्या वर्षी तिचं हे लग्न भारतीय कायद्यानुसार वैध लग्न नसल्याची चर्चा रंगली होती. आणि त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवातही झाली होती. ज्यावेळी तिला त्यावरुन विचारणा करण्यात आली तेव्हा त्यावर ती म्हणाली, माझ्या लग्नाला कुणी एक रुपया दिलेला नाही, लग्नाचा खर्चही कुणी केलेला नाही. अशावेळी मला माझ्या लग्नावरुन बोल लावणाऱ्यांची मी पर्वाही करत नाही. अशा शब्दांत नुसरतनं संताप व्यक्त केला होता. मला माहिती आहे की, मी प्रामाणिक आहे. मला कुठल्याही गोष्टींवरुन स्पष्टीकरण द्यायला आवडत नसल्याचेही नुसरतनं यावेळी सांगितले होते.

loading image
go to top