Highest Paid Actor In India: खान, कपूर, प्रभास सगळ्यांना मागे सोडून झाला भारतात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता?

highest earning bollywood actors
highest earning bollywood actors SAKAL
Updated on

Highest Paid Actor In India: सध्या मनोरंजन विश्वात बॉलिवूडवर टॉलिवूडचं वर्चस्व पहायला मिळत आहे. तरी देखील बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी मनोरंजन विश्वात आपलं स्थान कायमच पक्क केलं आहे.

यात सलमान, शाहरुख आणि आमिर हे तिन खान आघाडीवर आहेतच मात्र त्याच्यत अक्षयने देखील एंट्री केली होती.

चित्रपट बिग बजेटमध्ये बनवले गेले की त्या चित्रपटासाठी कलाकार तगडी फी आकारतात.

highest earning bollywood actors
Tamannaah Bhatia: आधी पाया पडली आणि मग.. फॅनची क्रेझ पाहून तमन्नाही लागली रडायला, व्हिडिओ व्हायरल

बऱ्याच वेळा तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि बॉलिवूडमधील इतर बड्या कलाकारांची फी ही एखाद्या चित्रपटाच्या संपूर्ण बजेटपेक्षा जास्त असते.

आता यातच सर्वात अधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादित नव्या कलाकारांची एंट्री झाली आहे. यात बॉलिवूडचे तीन खान किंवा इतर कलाकार नाही तर यातही साउथ कलाकाराने बाजी मारली आहे.

या कलाकरच्या नावाने कदाचित तुम्हाला आश्चर्य देखील मात्र आता या यादित साउथच्या थलपथी विजयने बाजी मारली आहे.

highest earning bollywood actors
Adipurush Collection: बॉक्स ऑफिस युद्धात 40 कोटी बजेट असेलला सारा विकीचा सिनेमा 600 कोटीच्या आदिपुरुषवर पडला भारी...

मिळालेल्या माहितीनुसार, थलपथी विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे आणि त्याने त्याच्या चित्रपटासाठी खुप तगडी फी घेतली आहे.

highest earning bollywood actors
Titanic Netflix: मेलेल्या टाळूवरचं लोणी.. टायटन घटनेनंतर नेटफ्लिक्सने घेतलेल्या निर्णयाने नाराजी

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत विजयने अनेकांचा विक्रम मोडला आहेत. याआधी विजयने रजनीकांत यांचा विक्रम मोडला होता. त्याने 'लिओ' चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतले होते.

त्याने त्याची फी 100 कोटींपर्यंत वाढवल्यानंतर आता थलपथी 200 कोटी रुपये मानधन घेत आहेत. थलपथी त्याच्या पुढील चित्रपटासाठी तब्बल 200 कोटींची फी आकारत असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे

रिपोर्टनुसार, विजयने 'थलपती 68'साठी 200 कोटी रुपये चार्ज केले आहेत. विजयचा हा 68 वा चित्रपट आहे, त्यामुळे चित्रपटाचे नाव 'थलपती 68' असे ठेवण्यात आले आहे.

विजय या चित्रपटानंतर इंडस्ट्रीला अलविदा करुन राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्याचा हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com