
गुगल ट्रेंड्सनुसार Google Trends, जगभरातील कोट्यवधी लोकांकडून भारतीय अभिनेत्यांबद्दल दररोज सर्च केलं जातं. मात्र युट्यूबवर सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडच्या 'सिंघम'ने अर्थात अभिनेता अजय देवगणने Ajay Devgn बाजी मारली आहे. गेल्या १२ महिन्यांत युट्यूबवर अजय देवगणला सर्वाधिक सर्च केलं गेलं. या यादीत त्याला अभिनेता सलमान खानची टक्कर पाहायला मिळते. सलमान खान, अल्लू अर्जून, अमिताभ बच्चन आणि थलपती विजय यांना अजयने मागे टाकलं आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सलमान, तिसऱ्यावर अल्लू अर्जुन, चौथ्यावर महानायक अमिताभ बच्चन आणि पाचव्या स्थानी थलपती विजय आहे. (this actor ranks No on Google Trends becomes the most searched Indian actor on YouTube)
जानेवारी २०२० मध्ये अजयचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजयने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. त्यानंतर अजयने 'त्रिभंगा' आणि 'द बिग बुल' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.
कोविडच्या संकटकाळातही अजयने त्याच्या परीने मदत केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अजयने धारावीमध्ये व्हेंटिलेटर्स दिले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता अजयने आणि बॉलिवूडमधील काही कलाकार मिळून मुंबई महापालिकेसाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये इमर्जन्सी युनिट स्थापन केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.