'कतरिनाशी लग्न केल्याचे परिणाम'; विकीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स | Vicky Kaushal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal

'कतरिनाशी लग्न केल्याचे परिणाम'; विकीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो धनुष आणि साई पल्लवीच्या 'राऊडी बेबी' या गाण्यावर नाचताना दिसतोय. विकीच्या या डान्सिंग व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले. अनेकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या आहेत. मात्र त्यातील सर्वाधिक कमेंट्स हे अभिनेत्री कतरिना कैफशी (Katrina Kaif) लग्न केल्यावरून आहेत. 'जेव्हा कतरिनाशी तुमचं लग्न होतं..', असं म्हणत नेटकऱ्यांनी विकीची मस्करी केली. विकीच्या या व्हिडीओला २३ तासांत ११ लाखांहून अधिक लाइक्स आणि ७ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'कतरिना वहिनीने व्हिडीओ शूट केला का', असा मजेशीर प्रश्न एका युजरने विकीला विचारला. तर 'यापेक्षा चांगला मीम कोणताच असू शकत नाही. कतरिना कैफशी लग्न झाल्यानंतर विकीची प्रतिक्रिया..', असं दुसऱ्याने लिहिलं. 'कतरिनाशी लग्न केल्याचे परिणाम' असंही एकाने म्हटलं आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला नुकताच एक महिना झाला. यानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले होते.

कतरिनाने विकीसोबतचा रोमँटिक सेल्फी पोस्ट केला. तर विकीने संगीत कार्यक्रमातील कतरिनासोबत डान्स करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. लग्नानंतर विकी-कतरिना जुहूमधील नव्या घरात राहायला गेले आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात इमारतीत या दोघांनी नवीन घर घेतलं आहे. कतरिनाने तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये घराची झलक दाखवली होती.

हेही वाचा: Vamika Turns One: पहा विराट-अनुष्काने आजपर्यंत शेअर केलेले वामिकाचे फोटो

९ डिसेंबर रोजी विकी-कतरिनाने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा याठिकाणी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. संपूर्ण कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. मालविका मोहनन, नेहा धुपिया, अंगद बेदी, शर्वरी वाघ, कबीर खान, मिनी माथूर, गुरुदास मान यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

Web Title: This Is What Happens When You Get Married To Katrina Kaif Says Fans As Vicky Kaushal Dances To Rowdy Baby

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top