TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे | Marathi TV Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte

TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

मराठी मालिकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असून अनेक मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नवनवीन ट्विस्ट, कलाकारांची एंट्री यांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास या मालिका यशस्वी ठरतायत. या आठवड्यातील टीआरपी TRP यादीतील टॉप १० मराठी मालिकांची यादी समोर आली आहे. यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेने 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेला मागे टाकलं आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका नेहमीच टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असते. मात्र सध्या या मालिकेची लोकप्रियता थोडीफार कमी झाल्याचं पहायला मिळतंय.

टीआरपीच्या यादीत सतत वर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका आता दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत झालेल्या नव्या कलाकाराच्या एण्ट्रीचा विशेष फायदा टीआरपीला झालेला दिसत नाही. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुलगी झाली हो तर चौथ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा या मालिका आहेत. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने पाचवं स्थान पटकावलं आहे.

हेही वाचा: 'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले

सहाव्या स्थानावर ठिपक्यांच्या रांगोळीचा महाएपिसोड आहे, सातव्या स्थानी माझी तुझी रेशीमगाठ, तर आठव्या स्थानी ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आहे. या मालिकेच्या महाएपिसोडने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. नवव्या स्थानी बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन तर दहाव्या स्थानी येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आहे.

loading image
go to top