
Tiger Shroff Ganpath Movie new poster look bollywood Actor : टायगर श्रॉफनं गेल्या काही वर्षातच स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगरनं बॉलीवूडचा आघाडीचा अॅक्शन हिरो म्हणून तयार केलेली प्रतिमा आता जगाच्या पाठीवर लोकप्रिय झाली आहे. अॅक्शनचा बादशहा म्हणून टायगरकडे पाहिले जाते.
आता टायगर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा गणपथ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टायगर या महत्वकांक्षी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सोशल मीडियावर टायगरच्या गणपथचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. त्यात टायगनं त्याच्या हाताला पट्टी बांधली असून त्याचा लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. यापूर्वी देखील याच चित्रपटातील व्हायरल झालेल्या पोस्टरनं टायगरच्या चाहत्यांना वेडं केलं होतं. आताही त्या पोस्टरवरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.
टायगरनं ती पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, त्याला कोण थांबवणार, ज्याच्या डोक्यावर साक्षात बाप्पाचा हात आहे. तुमच्यासमोर गणपथ...एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी....तेव्हा तयार राहा...२० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहामध्ये पाहायला नक्की विसरु नका...
यापूर्वी देखील टायगरच्या व्हायरल झालेल्या त्या पोस्टरवरुन नेटकऱ्यांनी टायगरचे कौतुक केले आहे. हा चित्रपट गणपथचा हा पहिला भाग असेल. गणपत ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा दुसरा भागही येत्या काळात पाहायला मिळणार असल्याचे मेकर्सनं सांगितलं आहे. टायगरशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.