सलमानप्रमाणे मी पण व्हर्जिन, कोण म्हटलंय असं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'सलमानप्रमाणे मी पण व्हर्जिन', कोण म्हटलंय असं...

'सलमानप्रमाणे मी पण व्हर्जिन', कोण म्हटलंय असं...

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) असे काही सेलिब्रेटी (celebrities) आहेत जे आपल्या अभिनयापेक्षा त्यांच्या इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतात. त्यात अभिनेता सलमान खानचं (salman khan) नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल. भलेही त्याचे चित्रपट शंभर कोटींपेक्षा जास्त बिझनेस करत असले तरी त्याच्या यावर्षीच्या चित्रपटांना तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. राधे द मोस्ट वाँटेट भाईजानला सलमानचा पूर्ण तडका होता. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल झाला. सध्या सलमान आणि टायगर श्रॉफच्या (tiger shroff) नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. सलमानचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है चा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वास्तविक सलमान आणि टायगर श्रॉफ यांनी मोठ्या मेहनतीनं आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. सलमानचा प्रेक्षकवर्ग ठरलेला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्यानं आपल्यासाठी काय खास पर्वणी दिली आहे हे पाहणे प्रेक्षकांना जास्त महत्वाचे वाटत असल्याचे दिसून आले आहे. सध्या टायगर श्रॉफचे वेगवेगळे लुक्स व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. टायगरकडे देखील मोठे प्रोजेक्ट आहेत. त्याच्या चित्रिकरणाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे हे दोन्हीही अभिनेते सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

सध्याच्या घड़ीला तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणून टायगर श्रॉफचे नाव घ्यावे लागेल. त्याच्या स्टंटची तरुणाई फॅन आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्याला हिरोच्या ऐवजी हिरोईन म्हटलं जातं होतं. असा खुलासा त्यानं अरबाज खानच्या एका कार्यक्रमामध्ये केला होता. त्यावरुन त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली. आताही टायगर अशाच एका बातमीवरुन ट्रोल झाला आहे. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.

अरबाज खानच्या एका शो मध्येच त्यानं एक वक्तव्य केलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्याला असे विचारण्यात आले की, तु व्हर्जिन आहेस का, त्यावर त्यानं गंमतीदार उत्तर दिलं. त्या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. त्यात टायगरनं आपल्या सुरुवातीच्या काळाचा उल्लेख केला आहे. आपल्याला कशाप्रकारे नाव ठेवण्यात आली याबाबत त्यानं सांगितलं आहे.

तु व्हर्जिन आहेस का या प्रश्नावर टायगर श्रॉफनं उत्तर दिलं आहे की, सलमान भाईजान सारखा मी ही व्हर्जिन आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला देखील अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सलमाननं जे उत्तर दिलं होतं त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Web Title: Tiger Shroff Talk About Social Media Trolling Answer In Salman Khan Style

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top