
'तुझ्या प्रेमापोटी मी Timepass 3 लिहिला' प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत..
timepass 3 : सध्या चर्चा आहे ती त्यांच्या 'टाइमपास 3' या चित्रपटाची. दगडूच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी दोन भागांमध्ये दाखवला, आता दरम्यानच्या काळात जेव्हा दगडूला प्राजक्ता जोडून गेली तेव्हा नेमकं काय झालं, याची भन्नाट स्टोरी म्हणजे हा 'टाइमपास 3' आहे. विशेष म्हणजे तरुणांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेष परब यांची जोडी पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षकांना कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतोय असे झाले आहे. आज 29 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून टाइमपास 2 मधील दगडू म्हणजेच टाइमपास चित्रपटाचा लेखक प्रियदर्शन जाधव याने प्रथमेश परब साठी खास पोस्ट लिहिली आहे. (timepass 3 writer priyadarshan jadhav shared post for prathamesh parab ravi jadhav hruta durgule)
प्रियदर्शन जाधवने एक खास पोस्ट शेअर करत प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. यात पोस्टमध्ये त्याने प्रथमेशसोबतचा एक खास फोटो आणि भावनिक पण गमतीशीर कॅप्शनही शेयर केले आहे. प्रियदर्शन म्हणतो, 'प्रिय प्रथमेश परब, उद्या Tp3 प्रदर्शित होईल, आणि सुपरहिट सुद्धा होईल ! तुला खूप खूप शुभेच्छा ! केवळ आणि केवळ आणि केवळ तुझ्या प्रेमापोटी ( फोटो पुरावा आहे ) मी टाइमपास ३ लिहिला ! नाहीतर मी काही लिहीत नसतो, हे तू लक्षात घे आणि “हेतू” ही लक्षात घे ! हल्ली सगळं सिरियसली घेणारा मी, टाइमपास करत लिहित नसतो ! खूप खूप यशस्वी हो ! मराठीतल्या ब्लॉकबस्टरची मोठ्या पडद्यावर होणार जबराट एंट्री ! ४०० स्क्रिन्स आणि १०,००० शोजसह टाइमपास ३ २९ जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला,'असे प्रियदर्शन जाधव याने म्हटले आहे. (timepass 3 box office collection)
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत आपला लाडका प्रथमेश परब (Prathamesh Parab) आहे तर पालवीची भूमिका तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, (vaibhav mangle) शांताराम परब म्हणजे भाऊ कदम (Bhau kadam), आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. आज हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर काय धुमाकूळ घालतोय हे लवकरच कळेल.
Web Title: Timepass 3 Writer Priyadarshan Jadhav Shared Post For Prathamesh Parab Ravi Jadhav Hruta Durgule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..