esakal | नुसरत जहाँच्या 'असूर'चा पोस्टर बघितला का?
sakal

बोलून बातमी शोधा

TMC MP Nusrat jahan signed her first film after entering into politics

अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहाँ हीने राजकारणामध्ये आपलं स्थान मिळवलं असलं तरी चित्रपटसृष्टीतून एक्झीट घेतली नाही. काही काळासाठी चित्रपटातून नुसरतचं दुर्लक्ष झालं असलं तरी आता मात्र ती आगामी चित्रपटातून प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे.

नुसरत जहाँच्या 'असूर'चा पोस्टर बघितला का?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : टीएमसीची सर्वात सुंदर खासदार अशी ओळख असणाऱ्या नुसरत जहाँ काही दिवसांपासून चर्चेत आहे. तुर्कीमधल्या डेस्टिनेशन वेडिंगचे त्याचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतर भारतात परतल्यावर पहिल्यांदा नुसरत संसदेत गेली. त्या पारंपारिक लुकच्या फोटोंची इंटरनेटवर खूप चर्चा झाली आणि त्याला अनेकांनी पसंतीदेखील दिली. अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहाँ हीने राजकारणामध्ये आपलं स्थान मिळवलं असलं तरी चित्रपटसृष्टीतून एक्झीट घेतली नाही. काही काळासाठी चित्रपटातून नुसरतचं दुर्लक्ष झालं असलं तरी आता मात्र ती आगामी चित्रपटातून प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच सिनेमा असून नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून याविषयीटी माहिती शेअर करत तिने पोस्टर अपलोड केला आहे. 'असूर' असं चित्रपटाचं नाव असून तो बंगाली चित्रपट असणार आहे. या पोस्टरमध्ये दूर्गा मातेला नमन करणारा एक व्यक्ती दिसत आहे. मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या पोस्टरनंतर आता मात्र नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे ती नुसरत यांच्या चित्रपटामधल्या लुकची.

नुसरत 2018 मध्ये 'नकाब' या चित्रपटामध्य दिसल्या होत्या आणि त्यानंतर बराच काळ त्या मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्या. आता मात्र त्यांनी परत एकदा सिनेसृष्टीत दमदार कमबॅक केल्याचं दिसत आहे. 

loading image
go to top