Amala Paul: हिंदू नसल्याच म्हणत अभिनेत्रीला नाकारला मंदिरात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amala Paul

Amala Paul: हिंदू नसल्याच म्हणत अभिनेत्रीला नाकारला मंदिरात प्रवेश

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला केरळमधील एका मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात 'धार्मिक भेदभावामुळे' प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी तिला रोखलं,असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

वृत्तानुसार, अमला पॉल सोमवारी मंदिरात गेली होती, परंतु मंदिर प्रशासनाने प्रथेचा कारण देत सांगितले की, या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो आणि तिला मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी दिली नाही.

हेही वाचा दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये असे नियम आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होतात. याचच ताजं उदाहरण केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम हिंदू मंदिराचे आहे. अमालाने याला निराशाजनक म्हटले आहे. यासोबतच त्यांनी व्हिजिटर रजिस्टरमध्ये तिच्यासोबत घडलेली ही घटना लिहिली आहे. त्यानंतर या प्रकरणाने पेट घेतला.

अमलाने लिहिलयं की, 'हे दुःखद आणि निराशाजनक आहे की 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही होत आहे. मला देवी मातेचं दर्शन घेता आलं नाही, पण दुरूनच मी तिचं दर्शन घेतलं. लवकरच धार्मिक भेदभाव दूर होईल. ती वेळ येईल जेव्हा आपल्या सर्वांना धर्माच्या आधारावर नाही तर माणसांसारखे समान वागणूक दिली जाईल अशी मला आशा आहे

हेही वाचा: Rakhi Sawant: राखीचा नवरा सलमानला घाबरला म्हणुन...आदिल खानबद्दल मोठा खुलासा

तर दुसरीकडे, मंदिर प्रशासनाशी याबाबत चर्चा केली असता, तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर ट्रस्टशी संबंधित लोकांनी सांगितले की त्यांनी केवळ मंदिराच्या नियमांचे पालन केले आहे. असं नाही आहे की इतर धर्माचे हिंदू अनुयायी मंदिरात येत नाहीत पण सेलिब्रिटी आल्यावरच वाद होतात.

हेही वाचा: SS Rajamouli: मी भारतातला हुकूमशहा पण... ' राजामौली पाहतोय हॉलिवूडचं स्वप्न

अमाला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. अमला पॉल ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमालाने नागा चैतन्य, राम चरण, अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. अमाला लवकरच अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :actresstollywood