KGF: 'KGF 3' लवकरच येणार...? चित्रपटाबाबत रॉकी भाईचा मोठा खुलासा..

KGF 3
KGF 3esakal

मुळचा कन्नड सिनेमात बनलेल्या 'केजीएफ'ला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतलं. या चित्रपटाने सर्वांनाच वेड केलं आहे. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून दोघांनीही चांगलेच रेकॉर्ड केले. या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा शेवट इतका उत्कंठावर्धक होता की प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा लागली होती. त्यातच 2022 मध्ये रिलीज झालेल्या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

'KGF Chapter 2' ने बॉक्स ऑफिसवर जवळपास 1250 कोटींची कमाई केली होती. याचित्रपटाच्या शेवट तर पहिल्या भागापेक्षाही जास्त रोमाचंक झालाय. या भागात तर रॉकी भाईचाच शेवट झाल्याचं दिसतंय. त्यामूळे एकीकडे खरंच रॉकीचं साम्रराज्य संपल असं बोललं जात असतांना दुसरीकडे तो पुन्हा जबरदस्त कमबॅक करेल या आशेने चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

KGF 3
'दक्षिणात्य चित्रपटाची खिल्ली उडवली जायची', त्यावर KJF स्टार यश म्हणतो, आम्ही....

'KGF 3' बद्दल आतापर्यंत अनेक प्रकारच्या बातम्या, व्हिडिओ समोर आले आहेत पण आता चित्रपटाचा हिरो रॉकी भाई म्हणजेच यशने सांगितले आहे की 'KGF' चा तिसरा भाग कधी येणार? अलीकडेच यशने एका मुलाखतीत त्याच्या 2022 च्या योजनांबद्दल सांगितले. त्याचबरोबर यशने सांगितले की त्याचा 'KGF Chapter 3' चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होईल.

यश याबद्दल स्पष्टच बोलला त्याने सांगितले की, 'KGF 3' बद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पण कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका. या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती आल्यास त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. यशला विचारण्यात आले की KGF 3 येईल ना? याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'सध्यातरी काही वेळ नाही. याबाबत आम्ही विचार केलायं. आमच्याकडे प्लॅन आहे. पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी हेच करतोय. आम्ही थोडा वेळ घेऊ आणि काय होते ते पाहू मग आम्ही त्यावर नंतर काम करू. पण सध्यातरी लवकर काहीच येणार नाही.

हेही वाचा भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

 याआधीही 'KGF' दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक मुलाखतीत केजीएफ ३ बनवण्याची शक्यता पूर्ण असल्याचे सांगितले होते. हे गरजेनुसार असेल. चित्रपटाचे दोन्ही भाग आणि त्यातील पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. म्हणूनच आम्ही ते पुढे नेऊ. पण आता हे कधी होणार? ते माहित नाही. पण आम्ही ते नक्कीच पुढे नेणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सध्यातरी 'KGF 3' लवकर येणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या चाहत्यांना अजूनतरी काही काळ प्रतिक्षा करावी लागते.

KGF 3
Copyright Act : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं KGF-2 कनेक्शन; राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com