Boycott Rashmika: रश्मिका मंदानाच्या चित्रपटांवर ‘बंदी’! काय आहे कारण जाणून घ्या .. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Rashmika Mandanna

Boycott Rashmika: रश्मिका मंदानाच्या चित्रपटांवर ‘बंदी’! काय आहे कारण जाणून घ्या ..

साऊथची सुपरस्टार आणि नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. रश्मिकाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटकात तिच्या दोन चित्रपटांवर बंदी घालण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

रिपोर्ट्सनुसार रश्मिकाचे सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' आणि 'वारीसू' यांना कर्नाटकातील थिएटरमध्ये बंदी घालण्यात येउ शकते. याचे कारण खुद्द रश्मिका मंदाना सांगत आहे. अलीकडेच रश्मिकाने एका मुलाखतीत तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगितले, परंतु तिने रक्षित शेट्टीच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेतले नाही, ज्याने तिला पहिला चित्रपट दिला. 

हेही वाचा: Kantara: रश्मिकासोबत काम करण्यास 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीचा नकार?;व्हायरल व्हिडीओत स्पष्टच बोलताना दिसला

रश्मिकाच्या वक्तव्यावरून आता तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रश्मिका मंदान्ना रक्षित शेट्टीच्या प्रॉडक्शन हाऊसबद्दल कृतघ्नपणे वागल्याचं बोलंलं जात आहे. कारण तिने तिच्या मुलाखतीत रक्षित शेट्टीला श्रेय दिले नाही

रश्मिका मंदान्ना आणि रक्षित शेट्टी देखील एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, त्यांची एंगेजमेंटही झाली होती. मात्र, काही कारणास्तव हे नातं तुटलं. मात्र कर्नाटकमधील लोकांना वाटतं की, रश्मिकानं करिअरसाठी रक्षितचा फायदा घेतला आणि त्याला धोका दिला अन् साखरपुडा तोडला होता.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्यामूळेच कर्नाटक राज्यात रश्मिकाच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. इतकंच नव्हे तर थिएटरच्या मालक संघटनेने रश्मिकाचे चित्रपट थिएटरमध्ये चालवणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतल्याचंही सांगितलं जात आहे. परंतू यासंदर्भात असून अधिकृत  घोषणा करण्यात आलेली नसली तरी रश्मिकाला सातत्याने कर्नाटक राज्यातून विरोधचा सामना करावा लागत आहे.