Oscars 2023: RRR चा न्यूयॉर्कमध्येही डंका ! ऑस्करसाठी दावा आणखी मजबूत

Oscars 2023
 Nomination
RRR movie
Oscars 2023 Nomination RRR movie esakal

भारतातून गुजराती चित्रपट 'छेलो शो' हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आल्यानंतर एसएस राजामौली यांनी त्यांचा 'आरआरआर' हा चित्रपटला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी स्वतंत्र प्रवेश म्हणुन नामांकन दिले. त्यातच RRR नं आता एक मोठं यश मिळालयं.

राजामौली यांना RRR साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा न्यूयॉर्क क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड देण्यात आला आहे. राजामौलीच्या विजयाने अनेकांना आश्चर्यचकित केले, कारण त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्टीवन स्पीलबर्ग, डैरेन एरोनोफ्सकी  आणि सारा पोली यांचाही समावेश होता. RRR रिलीज झाल्यापासून तो भारतातच नव्हे तर जगात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटाला परदेशी प्रेक्षक आणि सोशल मीडियावरील तज्ज्ञांकडून सतत पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Oscars 2023
 Nomination
RRR movie
Mrunal Thakur: मृणाल म्हणते,"बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड परवडलं!"

अमेरिकन वेबसाइट्सनुसार, राजामौली यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे 2023 मध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये RRRया चित्रपटाची शक्यता वाढली आहे. न्यूयॉर्क क्रिटिक सर्कल पुरस्कार विजेत्याची निवड जगभरातील टॉप पब्लिकेशनचे 50 पत्रकारांच्या गटाद्वारे केली जाते. राजामौली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याचा अर्थ असा आहे की RRR ला पाश्चात्य चित्रपट निर्मात्यांमध्ये त्यांनी योग्य ती लोकप्रियता मिळाली आहे, ज्यामुळे चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कारांसाठी दावा मजबूत होईल.

Oscars 2023
 Nomination
RRR movie
Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात साजिदला आठवलं त्याचं जुनं प्रेम..

दरम्यान RRR ने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट नुकताच चिनच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 'आरआरआर'ला अनेक बड्या दिग्दर्शकांनी आणि चित्रपट तंत्रज्ञांचाही पाठिंबा होता. या चित्रपटाला जगभरातून दाद मिळाली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'आरआरआर'ने वर्षातील दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशनचा पुरस्कार जिंकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com