अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल
अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल

अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे अध्यक्ष सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तपासणीसाठी जेव्हा रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांना कोरोना झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर कमल हासन यांना चाहत्यांनी गेट वेल सूनचे मेसेज केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते परदेशात होते. तिथून भारतात आल्यानंतर जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यासंबंधी कमल हासन यांनी व्टिट करुन माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेवरुन जेव्हा आलो तेव्हा मला हलकासा खोकला होता. जेव्हा मी तपासणी केली त्यावेळी मला कोरोना झाल्याचे दिसुन आले. अशावेळी मी तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. मला लोकांना सांगायचे आहे की, त्यांनी काळजी घ्यावी. कोविडचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही.

कमल हासन हे 15 नोव्हेंबरला शिकागोला गेले होते. त्यावेळी त्यांनी उत्त्तर अमेरिकेतील आपल्या काही चाहत्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना आगामी काळातील आव्हानं याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर ते काही दिवसांनी भारतात परतले. नुकताच कमल हासन यांनी आपला 67 वा जन्मदिवस साजरा केला. याशिवाय ते अजूनही वेगवेगळ्या टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहे.

loading image
go to top