Baba Trailer : संजय दत्तच्या 'बाबा'चा ट्रेलर प्रदर्शित

टीम ईसकाळ
गुरुवार, 18 जुलै 2019

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (ता. 17) दस्तुरखुद्द संजय दत्तच्या हस्ते प्रदर्शित झाला आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच ताणली गेली. हा चित्रपट आगळ्या अशा कथेवर तर बेतलेला आहेच, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड लाभली असल्याच्या पाऊलखुणा या ट्रेलरच्या माध्यमातून उमटतात. त्यामुळे प्रतीक्षा लागते ती चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेची म्हणजेच 2 ऑगस्टची.

एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे.

पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात.

त्यातून पुढे काय होते? बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो की त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे. 2 ऑगस्ट रोजी निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून संजय दत्त यांनी “बाबा” या त्यांच्या ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सबरोबर निर्मित पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर जुहू येथील पीव्हीआर सिनेमाज येथे संजय दत्तसह दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी, दिग्दर्शक राज आर गुप्ता, निर्माते मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि सर्व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer released of Marathi Movie Baba produced by Sanjay Dutta