Tridha Choudhury: बाबाजींच्या बबितानं आश्रमच्या दिग्दर्शकाविषयी दिली मोठी प्रतिक्रिया, 'त्यांनी मला...'

त्रिधाला आश्रम या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिनं या मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारली होती.
Tridha Choudhary Aashram web serise actress
Tridha Choudhary Aashram web serise actressesakal

Tridha Choudhary Aashram web series actress :

ज्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम नावाची मालिका पाहिली असेल त्यांना बाबाजी आणि बबिता कोण हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ओटीटीवर सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील वेबसीरिज म्हणून आश्रमकडे पाहिले गेले. आता या मालिकेतील अभिनेत्री त्रिधाची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

त्रिधाला आश्रम या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिनं या मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारली होती. तर बाबाजीच्या भूमिकेनं बॉबी देओलची वेगळीच क्रेझ तयार झाली. दोन्ही सेलिब्रेटींच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले. बॉबी देओल तर आता रणबीर कपूरच्या अॅनिमलमध्ये दिसणार आहे. त्यातील त्याच्या लूकची चर्चा आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचे तीन सीझन प्रदर्शित झाले असून त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वादही समोर आले आहे. मध्यप्रदेशमध्ये चित्रिकरण सुरु असताना त्यांच्यावर हल्लाही झाला होता. त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. मात्र काही झालं तरी ही मालिका पूर्ण करायचीच अशा निर्धारानं त्यांनी हा प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आणला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

त्रिधाच्याबाबत सांगायचे झाल्यास तिनं यापूर्वी काही बंगाली सीरिजमध्ये काम केले आहे. मात्र आश्रममधून तिला मोठी ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबईमध्ये मेटा ऑफिसमध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची भेट घेतली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या त्रिधानं प्रकाश झा यांच्याविषयी केलेलं ते वक्तव्य यामुळे ती चर्चेचा विषय आहे.

त्या मुलाखतीमध्ये त्रिधानं म्हटलं आहे की, आश्रमचा ४ सीझन येतो आहे आणि खूपच उत्साहित आहे. मी जिथे जाते तिथं लोकं माझं स्वागत करतात. जपनाम म्हणून माझ्या अभिनयाचे कौतुकही करतात. हे खूप आनंद देणारे आहे. यासाठी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांची आभारी आहे. त्यांनी ज्याप्रकारे मला त्या मालिकेमध्ये भूमिका आणि संधी दिली त्यामुळेच ही लोकप्रियता माझ्या वाट्याला आली आहे.

देशातल्या प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून प्रकाश झा यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी आश्रममधून मला खूपच प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आणले. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. एक कलाकार म्हणून त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूप काही शिकवून जाणारं आहे. अशा शब्दांत त्रिधानं प्रकाश झा यांचे कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com