esakal | 'तू नेहमीच गरोदर का असतेस?' ट्रोलरचा लिसाला अजब सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

lisa haydon

'तू नेहमीच गरोदर का असतेस?' ट्रोलरचा लिसाला अजब सवाल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मुंबई - प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) तिसऱ्यांदा आई होणार आहे. लिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो ती नेहमी शेअर करत असते. नुकताच तिने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये लिसाने बिकिनी घातली आहे. त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोला कमेंट करून एका युजरने तिला ट्रोल केले. यावेळी लिसाने त्या यूझरला उत्तर दिले.(troller says lisa haydon on her pregnancy photo that shes pregnant all the time)

सोशल मीडियावरील लिसाच्या फोटोला एका युजरने कमेंट केली,'असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस,तुला सतत गरोदर राहणं आवडतं का?' लिसाने या कमेंटला उत्तर दिले,'हो मला आवडतं.. ही खूप खास वेळ आहे. मात्र आता अजून नाही. आता बाळाला जन्म दिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याकडे लक्ष देणार आहे.' लिसाच्या या उत्तरावर त्या युजरने रिप्लाय दिला,'तुझ्याकडून हे ऐकून खूप मस्त वाटलं लिसा. तुझी फिगर आकर्षक आहे. गरोदरपणातील तुझे फोटो मला खूप आवडतात. तुला शुभेच्छा. काळजी घे आणि सुरक्षित रहा'.जून महिन्यातच लिसाची प्रसूती होणार असल्याचं तिने नुकतच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.

हेही वाचा: 'मला दुसरा सुशांतसिंग राजपूत व्हायचं नाही'

फेब्रुवारी महिन्यामध्ये लिसाने ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. लिसाने २०१६ साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होतं.२०१७ मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव जॅक आहे. तर तिने २०२० मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. लिसाच्या दुसऱ्या मुलाचं नाव लिओ आहे. लिसा चित्रपट आणि शो मधून नेहमी प्रेक्षकांच्या भेटीस येते. 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल' या शो मध्ये लिसा परिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसली होती. लिसाने 'आयेशा' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘क्वीन’ या चित्रपटामधील लिसाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

हेही वाचा: अंडरटेकरला कोण हरवणार? बॉलीवूडच्या खिलाडीनं स्वीकारलं आव्हान...

loading image
go to top