esakal | "मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला
sakal

बोलून बातमी शोधा

nikhil raut

"मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी Zee Marathi वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून स्वीटूच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र कथानकात अचानक ट्विस्ट आल्याने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. स्वीटूचं लग्न ओमकारशी न होता ऐनवेळी मोहितशी झाल्याने प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. मालिकेत अभिनेता निखिल राऊत Nikhil Raut हा मोहितची भूमिका साकारत आहे. नकारात्मक भूमिका साकारल्यामुळे निखिलला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकदा ही ट्रोलिंग मर्यादेपलीकडे जात असल्याचं निखिलने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला, "मालिकेच्या कथानकात असा ट्विस्ट येईल हे आम्हालासुद्धा माहित नव्हतं. शूटिंगच्या काही दिवस आधी आम्हाला कल्पना देण्यात आली होती. मला माहितीये, महाएपिसोडमध्ये आलेल्या वळणामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण असं का झालं हे त्यांना लवकरच समजेल."

हेही वाचा: 'बंद करून टाका मालिका'; स्वीटू-मोहितच्या लग्नावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया

ट्रोलिंगविषयी तो पुढे म्हणाला, "महाएपिसोड प्रसारित झाल्यानंतर ट्रोलिंग होईल याची थोडीफार कल्पना मला होतीच. नेमकं तेच झालं. एक माणूस म्हणून मलासुद्धा ओम आणि स्वीटू या भूमिकांसाठी वाईट वाटतंय. पण स्क्रिप्टमध्ये जे लिहिलंय ते मला करावंच लागणार आहे. कारण शेवटी मी फक्त अभिनेता आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला अनेकदा ट्रोल करण्यात येतं. माझ्यावरही टीका केली जाते, पण मी ते सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कधी कधी ट्रोलर्स मात्र त्यांची मर्यादा ओलांडतात. काहीजण माझ्या पत्नीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जाऊन कमेंट्स करतात. हे सहन केले जाणार नाही. अशा गोष्टींमुळे मला ट्रोलिंगचा राग येतो. लोकांनी हे समजलं पाहिजे की मोहित परबची व्यक्तीरेखा मी पडद्यावर साकारतो. पण खऱ्या आयुष्यात मी निखिल राऊत आहे, तो मोहितपेक्षा खूप वेगळा व्यक्ती आहे."

loading image
go to top